Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पदवीधरसाठी टिडीएफ पाठिंब्याबाबत पुनश्च विचार करणार : विजय बहाळकर व हिरालाल पगडाल
राजकारण

पदवीधरसाठी टिडीएफ पाठिंब्याबाबत पुनश्च विचार करणार : विजय बहाळकर व हिरालाल पगडाल

राज्य कार्यकारिणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टिडीएफ) नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत केले होते. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणुकीत कोणाला पुरस्कृत करावयाचे याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेणार आहे. तोपर्यंत सभासदांनी कार्यकारिणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजय बहाळकर व हिरालाल पगडाल यांनी केले आहे.

या संदर्भात पगडाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र संवाद न्यूजला ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, नासिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत टिडीएफने डॉ. सुधीर तांबे पुरस्कृत केले होते, परंतु त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल न केल्याने या मतदारसंघात असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. तांबे हे टिडीएफच्या पाठिंब्यावर या मतदार संघात तीन वेळा विजयी झाले होते व त्यांनी टिडीएफच्या ध्येयधोरणानुसार कामकाज केले होते.

आमदार तांबे यांनी यावेळी देखील टिडीएफकडे समर्थन मागणारा लेखी अर्ज केला होता, टिडीएफच्या राज्य कार्यकरिणीने त्यांची विनंती मान्य करून त्यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवून देखील डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

त्यामुळे या मतदारसंघात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या या परिस्थितीची दखल टिडीएफने घेतली असून या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पुरस्कृत करावयाचे यासंबंधी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन धोरण जाहीर केले जाणार आहे. तोपर्यंत सभासदांनी संघटनेच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष विजय बहाळकर व कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी केले आहे.

आमदार डॉ. तांबे यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी अथवा भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार नसल्याने शिक्षक लोकशाही आघाडी सत्यजित तांबे यांना पुरस्कृत करते की अन्य कोणत्या उमेदवाराला याबाबत काय निर्णय घेते याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 249
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.