Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निलंबन कारवाईनंतर आमदार डॉ. तांबे म्हणाले; न्यायावर माझा विश्वास चौकशीअंती सत्य समोर येईल
राजकारण

निलंबन कारवाईनंतर आमदार डॉ. तांबे म्हणाले; न्यायावर माझा विश्वास चौकशीअंती सत्य समोर येईल

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे यासंदर्भात आमदार तांबे यांनी एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

नाशिक पदवीधर मतदार संघात महा विकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आपण काँग्रेसचे असल्याचे स्पष्ट करत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण भाजपसह अन्य सर्व पक्षाच्या प्रमुखांना विनंती करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले होते.

तांबे यांची अपक्ष उमेदवारी आणि परंपरागत या मतदार संघावर दावा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिला नाही. उलट तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास तो देण्याची तयारी दाखवली. यामुळे सत्यजित तांबे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाने विरोध दाखविल्याने तसेच शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याने निवडणुकीत चूरस वाढली होती.

दरम्यान काँग्रेसने उमेदवारी देऊन देखील डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. रविवारी पक्षाने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी “माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे”. असे म्हटले आहे.

आमदार डॉ. तांबे यांचे ट्विट

माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे.

चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.

— Dr Sudhir Tambe (@DrSudhir_Tambe) January 15, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 463
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.