Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तरसाच्या हल्ल्यात बिबट्याचा बछड्याचा झाला मृत्यू
महाराष्ट्र संवाद विशेष

तरसाच्या हल्ल्यात बिबट्याचा बछड्याचा झाला मृत्यू

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : साकुर-शिबलापुर रस्त्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा बछड्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला नसून तरसाच्या हल्ल्यात झाल्याचे समोर आले आहे.

बुधवारी सकाळी साकुर शिबलापुर रस्त्यावर जिजाबा नागरे यांच्या शेतजमिनीलगत बिबट्याचे एक पिल्लू झोपलेल्या आवश्यक दिसले. त्यामुळे नागरिकांनी थोडे जवळ जात त्याचे निरीक्षण केले असता त्याच्या तोंडातून रक्तस्राव झाला असल्याचे आणि तो मृत असल्याची शंका आल्याने याची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे बछडे चार महिने वयाचे असल्याचा आणि त्याचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला. मृत बछड्याला ताब्यात घेत त्याची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे तपासणी केली असता या बछड्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेने झाला नसून तरसाच्या हल्ल्यात झाला असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

अवघ्या चार महिन्याच्या या बछड्याला अद्याप शिकारीची माहिती नसल्याने तरसाच्या हल्ल्यात तो मृत झाला असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून भक्षक झालेले बिबटे माणसांवर तसेच लहान बालकांवर हल्ले करत आहेत. बुधवारी रस्त्यावरच बिबट्याचे चार महिन्याचे बछडे मृत अवस्थेत आढळल्याने शिबलापूर, पानोडी, आश्वी, उंबरी बाळापुर, पिंपरी आदीसह प्रवरा नदी पट्ट्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर शहरालगतही बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी एका गाईने बिबट्याला पळवून लावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात फिरत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असली तरी या बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 393
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026

दोन फुटांवर मृत्यूचा थरार! आश्वी खुर्द येथे क्षिरसागर दाम्पत्य थोडक्यात बचावले; दोन विभागांच्या ढकलाढकलीत नागरिकांचा जीव टांगणीला

July 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.