Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरचा प्रचार थांबला; प्रचारामध्ये सोशल मीडिया ठरला वरचढ!
राजकारण

नाशिक पदवीधरचा प्रचार थांबला; प्रचारामध्ये सोशल मीडिया ठरला वरचढ!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 28, 2023Updated:January 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

नाशिक / अहमदनगर 

नाशिक पदवीधर मतदार संघासाठीच्या जाहीर प्रचाराचा तोफा शनिवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहे. पदवीधर साठी येत्या सोमवारी (ता.३०) तारखेला नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होत आहे. निवडणूक प्रचारामध्ये सोशल मीडियाचा यावेळी मोठा बोलबाला दिसून आला. काही माध्यमातील एकतर्फी बातम्या पदवीधरांनी फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून आले. पेड नावाचा विकृतीचा राक्षस याही निवडणुकीत दिसून आल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या. सोशल माध्यमातून अनेक पदवीधरांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. या निवडणुकीतील मतदार हा संपूर्णतः सुशिक्षित आणि पदवीधर असल्याने चांगल्या-वाईटाची जाण या मतदारांमध्ये दिसून आली.

नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये 16 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी प्रमुख लढत ही अपक्ष उमेदवारांमध्ये आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार नसल्याने तसेच आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने महाविकास आघाडीला या मतदारसंघात शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची आफत ओढावली आहे. याशिवाय विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे तांबे पिता-पुत्रावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचादेखील अधिकृत उमेदवार या मतदारसंघात नसल्याने ते सत्यजित तांबे यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रचाराचा समारोप झाला तरी देखील भारतीय जनता पक्षाने पाठिंब्याबाबतचा आपला सस्पेन्स प्रचार समारोपापर्यंत अद्यापही कायम ठेवला आहे. या मतदारसंघातील प्रमुख लढत ही आता अपक्षांमध्ये होणार आहे.

नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा निर्णय हा प्रामुख्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून दिसतो. त्यामुळे फडणवीस विखे यांच्या शिर्डी भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही समोर आलेले नाही. तर सत्यजित तांबे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उघडपणे निवडणूक प्रचारात दिसून आले. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणूक निकाल बदलविण्याची क्षमता भाजप कार्यकर्त्यात असल्याचे सांगत शेवटच्या क्षणी निर्णय आला की विजयाची गणिते बदलविणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केल्याने विखे यांची ताकद कोणाच्या पाठीशी उभे राहणार याबाबत देखील साशंकता आहे.

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विखे यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविते यावर देखील विजयाची गणिते ठरतील. प्रमुख उमेदवार असलेल्या अपक्ष तांबे-पाटील यांच्या लढतीमध्ये पदवीधर आणि निवडून येणारा भावी आमदार कोणासोबत जाणार हे 2 फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

निवडणूक प्रचार तोफा थंडावल्या असून सोमवारी नाशिक विभागातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यात 338 मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान घेतले जाणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 409
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

By अनंत पांगारकरJuly 18, 20260

संगमनेर: तालुक्यात जून महिना कोरडा गेल्यावर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून,…

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

July 18, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

आज, शनिवार १८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 18, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.