Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अर्थसंकल्पातून ग्रामीण विकासाचा नवा मार्ग दृष्टीक्षेपात : महसूल मंत्री विखे पाटील
राजकारण

अर्थसंकल्पातून ग्रामीण विकासाचा नवा मार्ग दृष्टीक्षेपात : महसूल मंत्री विखे पाटील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
लोणी :
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पातून ग्रामीण भारताच्‍या विकासाचा नवा मार्ग दृष्‍टीक्षेपात आला आहे. सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या कराबाबत घेतलेला महत्‍वपूर्ण निर्णय हा सहकार चळवळीच्‍या आर्थिक स्‍थैर्यासाठी मिळालेले मोठा पाठबळ असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पंशुसंवर्धन आणि दूग्‍धविकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.
अर्थसंकल्‍पावर भाष्‍य करताना विखे पाटील म्‍हणाले की, सादर करण्‍यात आलेल्‍या या अर्थसंकल्‍पामध्‍ये विकासाचे सात प्राधान्‍यक्रम निश्चित करण्‍यात आल्‍यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाच्‍या विकासाचा नवा रोडमॅप आता स्‍पष्‍ट झाला आहे. ग्रामीण भागात कृषि क्षेत्राला पाठबळ देतानाच सेंद्रीय शेतीला या अर्थसंकल्‍पामध्‍ये दिलेला प्राधान्‍यक्रम हा निश्चितच महत्‍वचा असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर केंद्र सरकारने वेळोवेळी सहकार चळवळीला पाठबळ दिले आहे. यंदाच्‍या अर्थसंकल्‍पातही सहकारातून शेतीचा विकास हा मंत्र देतानाच प्राथमिक सोसायट्यांना आता मल्टिपर्पज सोसायटीचा दर्जा देण्‍याच्‍या निर्णयाचे स्‍वागत करुन, सहकारी साखर कारखान्‍यांच्‍या कराबाबतचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशात सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर साखर कारखानदारीला दिलासा देणारे निर्णय होत आहेत. गेली अनेक वर्षे सहकारी साखर कारखान्‍यांवर असलेल्‍या कराचा बोजा आजच्‍या अर्थसंकल्‍पातून कमी करण्‍यात आला असून, या प्रलंबित कराच्‍या प्रश्‍नांबाबत घेतलेला महत्‍वपूर्ण निर्णय हा साखर धंद्याच्‍या दृष्‍टीने खुप महत्‍वपूर्ण असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. या घेतलेल्‍या निर्णयाबाबत मंत्री विखे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
कृषि‍ क्षेत्रासाठी डिजीटल प्‍लॅटफॉर्मची निर्मिती आणि कृषि पुरक उद्योगांसाठी अॅग्रीस्‍टार्टअप फंडची करण्‍यात आलेली घोषणा कृषि क्षेत्रात रोजगाराच्‍या नव्‍या संधी निर्माण करणारी ठरणार आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यासाठीही केंद्र सरकारने प्रोत्‍साहन दिले असल्‍याकडे लक्ष वेधून मंत्री विखे म्‍हणाले की, यंदाचे वर्ष हे प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्‍ट्रीय तृणधान्‍य वर्ष घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रीअन्‍न योजना जाहिर करुन, तृणधान्‍याचे उत्‍पादन जगामध्‍ये पोहोचविण्‍यासाठी शेतक-यांना दिलेली संधी ही कृषि क्षेत्राच्‍या आर्थि‍क विकासाची नवी दिशा ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
कौशल्‍य विकास योजनेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील सर्व कारागिरांना मोठी संधी या अर्थसंकल्‍पातून प्रथमच मिळाली आहे. भारताच्‍या परंपरेचे चित्र जगामध्‍ये उभे करण्‍यात या कारागिरांचा मोठा वाटा असल्‍याने यंदा प्रथमच अर्थंकल्‍पात या कारागिरांच्‍या विकासाचा विचार झाला.
आदिवासी विकास मिशन, जैवीक खतांच्‍या निर्मितीला प्राधान्य, उद्योग क्षेत्राला आवश्‍यक असलेल्‍या मनुष्‍यबळासाठी ऑनजॉब ट्रनिंगची घोषणा, लघु व सुक्ष्‍म उद्योगासाठी केलेली मोठ्या प्रमाणातील आर्थिक तरतुद, महिलांसाठी महिला बचत पत्राची योजनेबरोबरच देशातील तरुणांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात म्‍हणून जागतिक नोक-यांचे मार्गदर्शन करणारे ३० केंद्र आणि विद्यार्थ्‍यांबरोबरच शिक्षकांच्‍या प्रशिक्षणासाठीची सुरु केलेल्‍या योजनांचे विखे यांनी स्‍वागत केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 153
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.