Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गडकरी-फडणवीस यांचा गड ढासळला, नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर आडबाले विजयी; नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर
राजकारण

गडकरी-फडणवीस यांचा गड ढासळला, नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर आडबाले विजयी; नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2023Updated:02/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने विजयी सलामी दिल्यानंतर त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वपूर्ण असलेला फडणवीस-गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूरचा गड मात्र महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे सुधाकर आडबाले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करणाऱ्या सुधाकर आडबाले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आले असून महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार जाहीर झाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव केला.
नागपूर मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्लातून काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याने सत्ताधारी भाजप सोबतच गडकरी-फडणवीसांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार या भाजप दिग्गज नेत्यांचे वर्चस्व या मतदारसंघावर असल्याने महाविकास आघाडीचा हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले यांना 16500 तर ना. गो. गाणार यांना 6366 मते मिळाली गाणार यांचा 10134 मतांनी पराभव झाला. कोकण शिक्षक मतदार संघात भाजपने तर नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीने खाते उघडले असून उर्वरित नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या तीन ठिकाणची मतमोजणी सुरू आहे या ठिकाणचे कल अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

नाशिक पदवीधर मतदार संघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे त्यांच्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यापेक्षा 8266 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. तांबे यांना 15784 तर महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या पाटील यांना 7862 मते मिळाली असून मोठ्या प्रमाणात जवळपास दहा टक्के म्हणजेच 2741 मतं या मतदारसंघात बाद झाली आहेत. पदवीधरांनी ही मते एवढ्या मोठ्या प्रमाणात का बाद केली असावीत याबद्दल चर्चा सुरू आहे.

अशी आहे सविस्तर मतांची आकडेवारी

पहिली फेरी

📌 नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
➡️ वैध मते -25,259
➡️ अवैध मते – 2741

=========================
➡️सत्यजित सुधीर तांबे -15784
➡️शुभांगी भास्कर पाटील -7862
➡️ रतन कचरु बनसोडे-560
➡️ सुरेश भिमराव पवार-225
➡️अनिल शांताराम तेजा-28
➡️अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51
➡️अविनाश महादू माळी -268
➡️इरफान मो इसहाक-18
➡️ ईश्वर उखा पाटील-45
➡️बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142
➡️ॲड. जुबेर नासिर शेख-54
➡️ॲड. सुभाष राजाराम जंगले-46
➡️नितीन नारायण सरोदे-63
➡️पोपट सिताराम बनकर-24
➡️सुभाष निवृत्ती चिंधे-46
➡️संजय एकनाथ माळी-43
=============एकूण 25,259

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 244
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.