महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नासिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरी अखेर 15000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीनंतर तांबे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केले असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात मोठा जल्लोष सुरू केला आहे.
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत दिसत आहे. असे असले तरी या पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पदवीधरांनी आपली मते बाद केली आहेत. बाद मतांचे प्रमाण लक्षात घेता पदवीधरांनी असे का केले असावे अशी शंका निर्माण होते.
दुसऱ्या फेरी अखेर उमेदवार मिळालेली मते पुढील प्रमाणे :-
📌 एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
➡️ वैध मते – 50555
➡️ अवैध मते – 5445
=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 31009
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 16316
➡️ रतन कचरु बनसोडे : 1157
➡️ सुरेश भिमराव पवार : 360
➡️ अनिल शांताराम तेजा : 46
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100
➡️ अविनाश महादू माळी : 623
➡️ इरफान मो इसहाक : 28
➡️ ईश्वर उखा पाटील : 89
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 103
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104
➡️ नितीन नारायण सरोदे : 129
➡️ पोपट सिताराम बनकर : 37
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे : 83
➡️ संजय एकनाथ माळी : 76

