महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ज्यांच्या व्हाट्सअपचे स्क्रीन शॉट माध्यमांना पत्रकार परिषदेत दाखविले त्या सचिन गुंजाळ यांनी आपली भूमिका एका पत्राद्वारे ट्विटरवर व्यक्त केली आहे.
‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी या पत्राचा तपशील आणि अधिक माहिती देत आहोत.
सन्माननीय अतुल लोंढेजी,
आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मी मा. थोरात साहेबांचा OSD नाही तर प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या कार्यकाळात माझ्याकडे भारत जोडो यात्रेची जबाबदारी होती त्यामुळे घडलेल्या घटनेच्या दिवशी मी लुधियाना (पंजाब) येथे भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या कॉर्नर सभेच्या तयारीत व्यस्त होतो. म्हणजे 11 व 12 जानेवारीला मी पंजाबमध्ये होतो. महाराष्ट्रात नाशिकमध्ये नव्हतो.
11 जानेवारीला चुकीचा एबी फॉर्म मिळाला म्हणून सत्यजित तांबे यांनी मला फोन केला. त्यानंतर मी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन करून तुम्ही चुकीचा फॉर्म पाठवला आहे का? असे विचारले त्यावेळी, त्यांनी मी दुसरा फॉर्म पाठवतो याबाबत आपण कोणाला काही सांगू नका, असे मला सांगितले.
त्यावर मी त्यांना सांगितले की, ‘माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही कोणता फॉर्म पाठवणार आहात? त्याचा फोटो काढून मला पाठवा‘, असे सांगितले त्यावर त्यांनी मला कोऱ्या AB फॉर्मचा फोटो पाठवला. मी त्यावर त्यांना OK असा रिप्लाय दिला. हा संपूर्ण घटनाक्रम 11 जानेवारीचा आहे. तोपर्यंत AB फॉर्म तांबे यांना मिळाला नव्हता. जो स्क्रीन शॉट आपण माध्यमांना दिला आहे तो 11 जानेवारीचा आहे. आणि त्याक्षणाला देवानंद पवार नागपूरमध्ये होते आणि मी पंजाबमध्ये. त्यानंतर माझ्या माणसाला बोलावून त्याच्याकडे सीलबंद पाकीट देण्यात आले. म्हणजे तो स्क्रीनशॉट संगमनेरमध्ये AB फॉर्म ताब्यात मिळाल्याचा नसून, प्रदेशकडून पुन्हा चूक होऊ नये म्हणून मी कोणता AB फॉर्म आपण पाठवणार आहात याच्या खात्रीसाठी होता. तेव्हा AB फॉर्म नागपूरमध्ये देवानंदजी पवार यांचेकडेच होते.
प्रत्यक्षात 12 जानेवारीला सत्यजीत तांबे यांना AB फॉर्म मिळाले. ते देखील सीलबंद पाकिटात.
पुन्हा 12 तारखेला दुपारी 1.30 वाजेदरम्यान मला सत्यजीत तांबे यांचा फोन आला, त्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला आणि मला सांगितले, AB Form नाव टाकून आलेला आहे, डॉ. सुधीर तांबेचे त्यावर नाव आहे. दुस-या रकान्यात जिथे पर्यायी उमेदवाराचे नाव टाकता येते तिथे NIL लिहिलेले आहे.‘
त्यामुळे प्रदेश काँग्रेसने कोरे AB फॉर्म दिल्याचा दावा खोटा आहे.
आदरणीय अतुल लोंढेंजी आपण माझा नामोल्लेख करून चुकीची माहिती देणे टाळावे.
आपला स्नेही
सचिन गुंजाळ
AB Form घटनाक्रम
(सचिन गुंजाळ यांच्याशी संबंधित)
9 जानेवारी :
सायंकाळी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे AB Form संदर्भाने विचारणा
10 जानेवारी :
नागपूर येथे संध्याकाळी 7 वाजता सीलबंद पाकिटात AB Form मिळाले.
11 जानेवारी :
1.30 PM : नाशिकऐवजी नागपूर आणि औरंगाबाद विधानपरिषदचे AB Form आल्याची सत्यजीत तांबे यांची माहिती.
2.00 PM : संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन करून चुकीचे फॉर्म आल्याची माहिती.
3.20 PM : पूर्वी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून देवानंद पवार यांच्याकडून AB Form चे फोटो मागितले.
3.24 PM : WhatsApp वर AB Form चा फोटो मिळाला.
3.32 PM : सचिन गुंजाळ यांच्याकडून OK असे उत्तर. (महत्त्वाची नोंद : सदर OK हे फोटोकॉपी वर आहे तेव्हा AB Form नागपूर मध्ये होते, नाशिकमध्ये नाही)
4.30 PM : नागपूरहून पुन्हा सीलबंद पाकिटात AB Form ताब्यात घेतले.
12 जानेवारी :
1.00 PM : सत्यजीत तांबे यांच्या ताब्यात AB Form चे सीलबंद पाकीट दिले.
1.30 PM : सत्यजित तांबे यांचा फोन पुन्हा AB फॉर्म डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने आल्याची माहिती.
सन्माननीय अतुल लोंढे जी,
आपण माझा नामोल्लेख करून नाशिक पदवीधर मतदार संघाच्या AB Form संदर्भाने जी माहिती दिली त्यातील पूर्ण सत्य. pic.twitter.com/417HvXsbZs— Sachin Gunjal (@SachinGunjal) February 4, 2023

