Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमची चूक झाली; सत्यजित तांबेंबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले…
राजकारण

आमची चूक झाली; सत्यजित तांबेंबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले…

विरोधी पक्षनेते अजित पवारांचे विधान पुन्हा एकदा चर्चेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शिकलेल्या पदवीधर आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण निकालातून बघितले आहे. शिकलेल्या मतदाराने दिलेला कौल कशा प्रकारचा आहे हे आपण बघितले पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांच्या बाबतीत आमची चूक झाली त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
पवार शनिवारी रात्री बारामती येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. सभेतच पवारांनी तांबे यांच्या बद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करत त्यांच्या पाठीशी असल्याचे सुचित केले.
शुक्रवारी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका केली होती. पक्षांतर्गत तांबे थोरात यांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र पक्षातील काही नेत्यांनी रचले असल्याचा आरोप केला होता. तत्पूर्वी या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांनी वडील आणि मामांचा सल्ला ऐकून निर्णय घेण्याचा सल्ला देत तांबे यांचे समर्थन केले होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी अजित पवार यांनीच सत्यजित तांबेंच्या घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होते असे सांगत थेटपणे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
सत्ताधाऱ्यांविरोधात पदवीधर शिक्षकांचा कौल
बारामतीच्या सभेत अजित पवार म्हणाले, राज्यातील शिक्षक आणि पदवीधरांनी कोणाला निवडून दिले आहे हे समोर आहे. फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निकाल असून अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहे. शिकलेल्या मतदारांनी कोणत्या प्रकारचा कौल दिला आहे हे सामान्य माणसांनी बघितले पाहिजे.
तांबे यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले, सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. तरुण जर चांगले काम करत असेल तर तरुणांना संधी दिली पाहिजे, या मताचा मी आहे. मात्र नाशिकची जागा काँग्रेसकडे असल्याने आणि त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्याने त्यात मी लुडबुड करण्याचे काही कारण नव्हते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 550
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.