Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा धमाका! दोन्ही गटातील अजिंक्यपद; पाच सुवर्णसह सोळा पदकांची कमाई
सामाजिक

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा धमाका! दोन्ही गटातील अजिंक्यपद; पाच सुवर्णसह सोळा पदकांची कमाई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारा मध्यप्रदेशात आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने धमाका केला. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या योगासनपटूंनी पश्‍चिम बंगाल, हरयाणा, तामीळनाडू व मध्यप्रदेशच्या संघांशी एकतर्फी लढत देत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर ही स्पर्धा गाजवली. या संपूर्ण स्पर्धेत योगासनांमध्ये वर्चस्व राखणार्‍या महाराष्ट्र संघाने पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या अजिंक्यपदाचा किताबही पटकाविला.
उज्जैन येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पारंपरिक प्रकारात महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याने सुवर्ण तर स्वराज फिस्के याने कांस्य पदक मिळवले. याच प्रकारात मुलींच्या गटात निरल वाडेकरने रौप्य पदक प्राप्त केले. कलात्मक प्रकारात स्वराज फिस्केने सुवर्ण व निबोध पाटीलने कांस्य तर मुलींच्या गटात रुद्राक्षी भावेने सुवर्ण, निरल वाडेकरने रौप्य आणि स्वरा गुजरने कांस्य पदकांची कमाई केली. तालात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारात महाराष्ट्राच्या अंश मयेकर व नानक अभंग यांनी रौप्य, रुपेश सांगे व सुमित बंडाळे यांनी कांस्य तर मुलींच्या गटात देवांशी वाकळे व तृप्ती डोंगरे यांनी सुवर्ण आणि स्वरा गुजर व प्रांजल व्हन्ना यांनी रौप्य पदकं मिळवले.
कलात्मक योगासनांच्या दुहेरी प्रकारातही महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम राखतांना मुलांच्या गटातील आर्यन खरात व प्रणव साहु यांच्या जोडीने सुवर्ण आणि प्रीत बोरकर व निबोध पाटील यांच्या जोडीने रौप्य पदक पटकाविले. तर, मुलींच्या गटातील वैदेही मयेकर व प्रांजल व्हन्ना यांनी रौप्य आणि तन्वी रेडिज व रुद्राक्षी भावे यांच्या जोडीने कांस्य पदक  मिळवतांना पदक तालिकेत महाराष्ट्र संघाला अव्वलस्थानी नेवून पोहोचवले.
या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर महाराष्ट्र संघात एकोणावीस पैकी सतरा खेळाडू असलेल्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी पाच सुवर्ण, सहा रौप्य व पाच कांस्य पदकांची कमाई करतांना पुन्हा एकदा खेलो इंडिया युथ गेम्समधील योगासनांचा अजिंक्यपद किताब पटकाविला. मुलांच्या गटात एक सुवर्ण व एक कांस्य पदकं मिळवणार्‍या पश्‍चिम बंगाल संघाला दुसरे, तर प्रत्येकी एक रौप्य पदक मिळवणार्‍या हरयाणा व तामीळनाडू संघाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील मुलींनीही उत्कृष्ट सादरीकरण करतांना एकूण आठ पदकांची कमाई केली. त्यात दोन सुवर्ण, चार रौप्य व दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. तामीळनाडूच्या संघाने एक सुवर्ण व एक कांस्य पदक मिळवत दुसरे तर एका सुवर्ण पदकासह मध्यप्रदेश संघाने तिसरे स्थान मिळवले. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्र संघाने मिळविलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर व सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राला या स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल क्रीडा आयुक्त सुहास दिवटे यांनी संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र संघातील योगासनपटूंना योगप्रशिक्षक मंगेश खोपकर, प्रवीण पाटील, स्वप्नील जाधव, किरण वाडेकर, रुपेश मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक रवीभूषण कुमठेकर व महाराष्ट्र शासनातर्फे निलीमा आडसूळ या संघासोबत उज्जैन येथे गेल्या होत्या.

राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत योगासनांचे अफलातून सादरीकरण करतांना मुला-मुलींच्या दोन्ही गटातील सर्वसाधारण अजिंक्यपदाचा किताब पटकाविणार्‍या महाराष्ट्राच्या संघातील एकूण 19 खेळाडूंमध्ये संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील 17 विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्याच्या संघाने मिळविलेल्या एकूण 16 पदकांपैकी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी चार सुवर्णसह एकूण 14 पदके पटकाविली हे विशेष.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 138
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.