Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उच्चांकी गर्दीत शिंदेशाही बाणा कार्यक्रमाची धमाल
सामाजिक

उच्चांकी गर्दीत शिंदेशाही बाणा कार्यक्रमाची धमाल

आमदार थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तालुका एकवटला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर

एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला देणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सहभाग घेतला असून तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या शिंदेशाही बाणा कार्यक्रमात विक्रमी गर्दीत नागरिकांनी धमाल केली.
जाणता राजा मैदान येथे नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम प्रख्यात गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे व उत्कर्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नाशिक पदवीधरचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे आदींसह नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’ या गीताने सुरुवात केली. तर महागायक आनंद शिंदे यांनी ‘पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा’ हे गाणे गाताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर मिलिंद शिंदे यांनी गायलेली ‘गेला कान्हा कुण्या गावा’ या गवळणीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. स्टार गायक उत्कर्ष शिंदे यांनी ‘तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, अंबे कृपा करी’ हे गीत गाताच सर्वत्र एकच जल्लोष झाला.

यानंतर आनंद शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गायलेल्या
‘दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्य भूमीवर, एक त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर’ या गीतावेळी अंगाला शहर आले. तर ‘घागर गळकी घेऊन बाई निघाली’, ‘जवा नवीन पोपट’ यांसह विविध लोकगीतांनी धमाल उडून दिली. ‘कोंबडी पळाली’सह आदर्श शिंदे यांनी गायलेले ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ याचबरोबर ‘आवाज वाढव डीजे’ या गीताला उपस्थित तरुण व महिलांनी भरभरून दाद दिली. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांनी गायलेली ‘उड जायेगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली’ या कव्वालीला संगमनेरकरांनी डोक्यावर घेतले.  काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्तृत्वाची गौरवगाथा असणारे आनंद शिंदे यांनी गायलेले ‘राज्यात गाणं गाजतय जोरात बाळासाहेब थोरात’ हे गीत गाताच जाणता राजा मैदानावर एकच जल्लोष झाला.

आ. थोरात यांच्या मनोगतावेळी मैदान स्तब्ध
खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सुमारे दीड महिन्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांना स्क्रीनवर समोर सर्वांनी पाहिल्यानंतर सर्व मैदान स्तब्ध झाले. आमदार थोरात यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उपस्थित तरुण नागरिक आबाल वृद्ध व तालुक्यातील तमाम जनतेला गहिवरून आले. उपस्थित सर्वांनी थोरात साहेबच आपले कुटुंब प्रमुख असल्याने आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 330
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.