Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकरांसह भाऊसाहेब थोराताना वंदन करत सत्यजित तांबेंनी घेतली शपथ
राजकारण

छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकरांसह भाऊसाहेब थोराताना वंदन करत सत्यजित तांबेंनी घेतली शपथ

'एकच वादा सत्यजित दादा' पाठोपाठ 'एकच वादा अजित दादा' घोषणांनी सभागृह दुमदुमले;
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2023Updated:08/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
‘एकच वादा… सत्यजित दादा’ पाठोपाठ ‘एकच वादा… अजित दादा’ अशा घोषणांनी विधान परिषदेचे सभागृह बुधवारी दुमदुमून गेले होते. सत्यजित तांबे यांच्या शपथविधी सोहळ्यातील या घोषणांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या विचारधारेचा वारसा सांगितला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांसह भाऊसाहेब थोरात यांच्या नावाचा उल्लेख करत तांबे यांनी शपथ घेतल्याने सध्या तरी ते भाजपापासून चार हात दूर असल्याचे स्पष्ट झाले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिक्षक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषदेच्या सभागृहात पार पडला. तांबे यांच्या बंडखोरीवरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ घटनेचे पदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीत खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया देताना थोरात यांच्यासारख्या नेत्याला जर राजीनामा द्यावा लागत असेल तर काँग्रेस श्रेष्ठींनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे म्हटले होते.
नेमके काय घडले…
नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे शपथ घेण्यासाठी पुढे आले असता त्यांच्या समर्थकांनी ‘एकच वादा… सत्यजित दादा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या समर्थकांनीही ‘एकच वादा… अजितदादा’ असा जयघोष सुरू केला. शपथविधी समारंभावेळी तांबे-पवारांच्या नावाने झालेल्या घोषणाबाजीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
नाशिक पदवीधर मतदार संघात आघाडीची मते तांबे यांना मिळाल्याचे विधान करत या मतदारसंघात आमचे चुकले सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती असे स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी तांबे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात झडत होत्या. या घोषणाबाजीमुळे या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर भाऊसाहेब थोरात यांच्या नावाचा उल्लेख करत तांबेनी घेतली शपथ
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासह आजोबा थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना वंदन करीत सत्यजित तांबे यांनी आपल्या पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली. तांबे यांनी घेतलेल्या या शपथेची चर्चा रंगली असून छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा उल्लेख केल्याने ते भाजपपासून सध्या तरी दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शपथ घेतल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे डॉ. तांबे नेमके काय म्हणतात…

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून सत्यजीतने आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मला विश्वास आहे की, सत्यजीत या पदाला योग्य न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सत्यजीत, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा! pic.twitter.com/6lz3zWsoBu

— Dr Sudhir Tambe (@DrSudhir_Tambe) February 8, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 284
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.