Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माधवलाल मालपाणी स्मृती मॅरेथॉन स्पर्धेत राठोड, अंत्रे, हासे, भारद्वाज, चौधरी ठरले विजेते
सामाजिक

माधवलाल मालपाणी स्मृती मॅरेथॉन स्पर्धेत राठोड, अंत्रे, हासे, भारद्वाज, चौधरी ठरले विजेते

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2023Updated:12/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
स्वर्गीय उद्योगपती माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पाच गटांतील विजेतेपदे अनुक्रमे अजय राठोड, आर्या अंत्रे, खुशी हासे, सचिन भारद्वाज आणि संदीप चौधरी यांनी पटकावले.

मालपाणी उद्योग समूहाचे स्व. उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ मागील १० वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सफायरद्वारे सहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते.

रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालपाणी लॉन्सपासून स्पर्धेला शुभारंभ झाला. लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोठावदे यांच्यासह मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे चेअरमन बाळासाहेब देशमाने, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष, गिरीश व आशिष मालपाणी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, ‘सफायर’चे अध्यक्ष उमेश कासट यांचा समावेश होता. स्पर्धेनंतर मालपाणी लॉन्स येथे पारितोषिक वितरण समारंभ झाला. मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने विजेत्यांना ३६ हजार रुपयांची रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात आली.

‘सफायर’चे संस्थापक-अध्यक्ष उद्योजक ला. गिरीश मालपाणी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘रन फॉर फिटनेस’ असा हा उपक्रम सर्व वयोगटातील उत्साही स्पर्धकांच्या उत्स्फूर्त व भरगच्च सहभागाने दरवर्षी गाजत असतो. सर्व स्पर्धकांना विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला होता.

स्पर्धेसाठी मुलामुलींचे ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी असे वेगवेगळे गट करण्यात आले होते. त्यापुढील वयाच्या स्पर्धकांसाठी खुला गट ठेवण्यात आला होता. सर्वांसाठी ६ किमी अंतराची ही स्पर्धा होती. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके व विजेतेपदाची पदके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक गटातील चौथा क्रमांक आणि उत्तेजनार्थ क्रमांक यांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके दिली गेली. सर्व गटात मिळून बक्षिसांची एकंदरीत संख्या चाळीस इतकी होती.

प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी आणि श्रीनिवास भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी, प्रकल्पप्रमुख सुनिता मालपाणी, पूजा कासट, श्रद्धा मणियार, अनिरुद्ध डिग्रसकर, अतुल अभंग, चैतन्य काळे, कृष्णा आसावा, प्रणित मणियार इत्यादी लायन्सने प्रकल्पप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

प्रकल्प समन्वयक म्हणून श्रीनिवास भंडारी, राजेश रा. मालपाणी, महेश डंग तर प्रकल्प समिती सदस्य म्हणून डॉ अमोल पाठक, अमर लाहोटी, नामदेव मुळे, विजय ताजणे, रोहित मणियार, विलास बेलापूरकर, सुमित मणियार, अतुल देशमुख, धनंजय धुमाळ, जितेंद्र पाटील, विशाल नावंदर, सिद्धांत कासट, सुभाष मणियार, जितेश लोढा, योगेश जोशी, ओम इंदाणी, अमोल वालझाडे, संकेत कलंत्री, देविदास गोरे, मीना मणियार, राजश्री भंडारी, डॉ. मधुरा पाठक, नम्रता अभंग, प्रियंका कासट, अनुजा सराफ, आदित्य राठी, मंजुषा भोत यांच्यासह सर्व सफायर सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 323
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.