Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकोप्याचे आदर्श उदाहरण; गावच्या हरिनाम सप्ताहाचा मंडप मुस्लिम बांधवांकडून
सामाजिक

एकोप्याचे आदर्श उदाहरण; गावच्या हरिनाम सप्ताहाचा मंडप मुस्लिम बांधवांकडून

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा गावातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा जपत हरिनाम सप्ताहामध्ये उभारण्यात आलेल्या मंडप खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात रविवार दि. १२ ते रविवार दि.१९ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी बोटा, केळेवाडी, कुरकुटवाडी, तळपेवाडी, माळवाडी, हनुमाननगर ग्रामस्थांच्या पुढाकाराने कीर्तनानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आहे. गावातील सर्वधर्माच्या लोकांनी एकत्र येत महाप्रसादाचा दिवस वाटून घेतला आहे. यंदा सप्ताहाच्या आयोजनामध्येही मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला आहे. सर्वमुस्लीम बांधवांनी सप्ताह काळात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान, बोटा गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या अनेक वर्षांपासून गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम आहे. या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. मुस्लिम बांधवांनी मंडप खर्चाची जबाबदारी घेत धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे.

हरिनाम सप्ताह कालावधीत मंडप खर्चाची जवाबदारी मुस्लिम बांधवांनी घेणे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रत्येक गावात असे आयोजन केल्यास हिंदू-मुस्लिम धर्मात निर्माण होणारी दरी कमी होईल.
संतोष (पांडू) शेळके, उपसरपंच बोटा

महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षी सप्ताहाचे आयोजन असते. यंदा ग्रामस्थांनी भव्य दिव्य आयोजन केले असून सर्वधर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे मंडप खर्चाचे यजमानपद मुस्लीम बांधवाना द्या, अशी विनंती आम्ही सप्ताह कमिटीला केली होती. कमिटीने सामाजिक एकोपा आणि सलोख्यासाठी दोन पावले पुढे येऊन आम्हाला मंडप खर्चाची जवाबदारी दिली आहे.
शौकत शेख, नुरानी मस्जिद व कब्रस्तान ट्रस्ट

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 389
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.