Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्यजीत तांबे यांच्या नव्या ट्विटमुळे पून्हा चर्चांना उधाण; मामांचा हात सोडणार कि घट्ट धरणार
राजकारण

सत्यजीत तांबे यांच्या नव्या ट्विटमुळे पून्हा चर्चांना उधाण; मामांचा हात सोडणार कि घट्ट धरणार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2023Updated:14/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी एक नवे ट्विट करत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात केली आहे. एकीकडे आपण कॉग्रेस सोडली नसल्याचे सांगणाऱ्या सत्यजीत तांबे यांना या ट्विटमधून नेमके काय साध्य करायचे याची चर्चा पून्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तांबे मामांचा हात सोडणार की भाऊसाहेब थोरात यांच्या विचारावर वाटचाल करण्याचे सुचित करत मामांचा हात घट्ट पकडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तांबे या ट्विटने भाजपच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉग्रेसचे बंडखोर नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी निवडून आल्यानंतर आपण अपक्षच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यापाठोपाठ सोमवारी संगमनेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तुझी सगळी टीम कॉग्रेसमध्ये आहे, तुला आमच्याशिवाय आणि आम्हाला तुझ्याशिवाय करमणार नाही, तु किती दिवस अपक्ष राहतो, ते बघुया असे म्हणत पुन्हा एकदा कॉग्रेस प्रवेशाचे संकेत दिले होते.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीनंतर तांबे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडत आपण कॉग्रेस सोडली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच आपण अपक्ष आमदार म्हणून काम करणार असल्याचे सुचित केले होते. त्यापाठोपाठ विधान परिषदेत झालेल्या शपथविधी समारंभातही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह आजोबा सहकारमहर्षी, स्वातंत्रसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीला वंदन करत शपथ घेतांना आपण कोणत्या विचारधारेसोबत आहोत, हे स्पष्ट केले होते.
मात्र मंगळवारी त्यांनी केलेले ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की,
“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी|
घरट्याच काय बांधता येईल केव्हाही… क्षितीजा पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी|” या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या ट्विटमुळे तांबे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
नजरेत सदा नवी दिशा असावी ।

घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 527
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.