Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कैलास खेर व डॉ. कुमार विश्‍वास यांचे कार्यक्रम; ३०० कलाकार साकारणार रामायण महानाट्य
सामाजिक

कैलास खेर व डॉ. कुमार विश्‍वास यांचे कार्यक्रम; ३०० कलाकार साकारणार रामायण महानाट्य

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक मेजवाणी!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेरचे सुपुत्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध उद्योगपती, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या एकसष्टीनिमित्त दिनांक 17 ते 20 फेब्रुवारी असे चार दिवस संगमनेरमध्ये अभीष्टचिंतन समारोह साजरा होणार आहे. या समारोहामध्ये संगमनेरकर रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याची महिती डॉ. संजय, मनिष, गिरीश व आशीष मालपाणी यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता जाणता राजा मैदानावर माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ. संतोष खेडलेकर लिखित राजेश मालपाणी यांच्या कार्पोरेट आयुष्यावर आधारित ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
यानंतर विश्वविख्यात गायक, संगीतकार कैलाश खेर आणि सहकारी भक्तीरसमय ‘कैलाशा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कैलास खेर यांनी भारतीय चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. देश-विदेशात मोठ्या प्रमाणात त्यांच्या संगीत रजनीचे कार्यक्रम होत असतात. चित्रपट गीतांच्या सोबतच त्यांची चेतनादायी, जोशपूर्ण व अंगावर रोमांच उभे करणारी भक्तीगीतं गायनशैली लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
दिनांक 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस संध्याकाळी सहा वाजता जाणता राजा मैदानावरील भव्य व्यासपीठावर जगप्रसिद्ध हिंदी कवी आणि प्रेरक व्याख्याते डॉ. कुमार विश्वास ‘अपने अपने राम’ ही पारिवारिक जीवनमूल्यांची रोमहर्षक कथा सादर करणार आहेत. खेर व डॉ. विश्वास यांचे चाहते जगभर विखुरलेले आहेत. या दोन्ही दिग्गज कलाकारांना प्रत्यक्ष बघण्याची, ऐकण्याची संधी संगमनेरकरांना प्रथमच मिळणार आहे.
सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता जाणता राजा मैदानावर स्वामी गोविंद देव गिरि यांच्याहस्ते राजेश मालपाणी यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. हा सोहळा सर्वांच्या वतीने एकत्रितपणे होत असल्याने व्यक्तिगत सत्कार करण्याचा आग्रह कोणीही धरू नये अशी विनंती करण्यात आली आहे. सत्कारानंतर चार हजार चौरस फुटांच्या भव्य रंगमंचावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारीत, डोळ्यांचे पारणे फेडणारे दिमाखदार महानाट्य ‘रामायण’ सादर होणार आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित प्रभू श्रीरामांचे जीवन चरित्र असलेल्या या महानाट्यात रामायणातील अपरिचित कथांचा नाट्यविष्कार बघण्यास मिळेल. या महानाट्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ३०० कलाकारांचा सहभाग असणार आहे. प्रभू श्रीरामांच्या गुणांचा आदर्श प्रस्तुत करणारे रोमहर्षक प्रसंग, आकर्षक वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय व स्मरणीय संवाद, मनमोहक नृत्य, भावपूर्ण गीत-संगीत, अत्याधुनिक व सुंदर ध्वनी-प्रकाश संयोजन यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आणि दोन तास थेट रामायण काळात घेऊन जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा संगमनेरकर रसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन मालपाणी परिवाराच्या वतीने जय, यशोवर्धन व हर्षवर्धन मालपाणी यांनी केले आहे. कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी चारचाकी वाहने आणण्याचे टाळावे व कोणत्याही मौल्यवान चीजवस्तू सोबत आणू नयेत असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 270
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.