Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुरुवारी भाजपच्या प्रचारासाठी हजेरी लावणारे खासदार बापट आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात
राजकारण

गुरुवारी भाजपच्या प्रचारासाठी हजेरी लावणारे खासदार बापट आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/02/2023Updated:17/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
भारतीय जनता पक्षाकडे मात्र नेत्यांची फळी असताना देखील प्रकृती अस्वस्थ असताना देखील खासदार गिरीश बापट यांना गुरुवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराकरिता बोलाविण्यात आले होते. त्यामुळे रासने यांच्या प्रचारासाठी व्हीलचेअरवर केसरी वाड्यात उपस्थित राहिलेल्या बापट यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वजनदार नेते पक्षाकडे असतानाही कसबा पेठ पोटनिवडणुक भाजपसाठी अवघड बनल्याने गुरुवारी प्रकृती अस्वस्थ असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. गुरुवारी व्हीलचेअरवर केसरी वाडा येथे कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते.
सत्तेत असताना देखील होम स्पीच असलेल्या उपराजधानीसह विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागा गमावल्यानंतर भारतीय जनता पक्षासाठी पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत या जागा मिळविण्याचा चंग भाजपने बांधला आहे. यासाठी भाजपकडून सर्व ताकद पणाला लावण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून भाजप खासदार गिरीश बापट यांची पक्षाकडून कधीही विचारपूस करण्यात आली नाही. परंतु कसबा पेठ निवडणुकीसाठी प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांना प्रचार करण्यासाठी बोलविण्यात आले. कसब्याचे उमेदवार रासने यांचा प्रचार करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले होते. परंतु आता दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने बापट यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकृती अस्वस्थ असताना देखील गिरीश बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत आणि पक्षाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली. यावेळी ते व्हीलचेअरवर आले होते. नाकात ऑक्सिजनची नळी, व्हीलचेअरला ऑक्सिजन सिलेंडर लावून ते केसरी वाडा येथे आले. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मुद्द्यावरून भावुक झाले. ज्यामुळे त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना देखील गिरीश बापट यांचे हात थरथरत होते.
दरम्यान, भाजपने स्वतःच्या फायद्यासाठी गिरीश बापट यांना प्रकृती अस्वस्थ असताना देखील बोलावले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. या आधी बापट यांनी प्रकृती ठीक नसल्याने प्रचाराला उपस्थित राहणार नाही, असे पत्र पक्षातील नेत्यांना पाठवले होते. पण गिरीश बापट नाराज असल्याचे त्यावेळी बोलण्यात येत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली आणि बापटांना प्रचाराला उपस्थित राहण्यास सांगितले. पण यामुळे आता खरंच गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्या विषयी ट्विट केले आहे.

असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख.
देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले.
मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही !@MPGirishBapat #BJP #Pune pic.twitter.com/DZjKlnOYJ0

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 292
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.