Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पेड न्यूज प्रकरणी चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस; कारवाईकडे लक्ष
राजकारण

पेड न्यूज प्रकरणी चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस; कारवाईकडे लक्ष

पोट निवडणुकीत आर्थिक उलाढाल जोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पुणे
पिंपरी चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच निवडणूक आयोगाकडून भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघासाठी रविवारी पोट निवडणूक होत आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने या दोन्ही पोट निवडणूक प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही जागा बिनविरोध न झाल्याने भाजपचा हिरमोड झाला आहे.

भाजप सोबतच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते या दोन्ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रचारात उतरले आहे. अशातच चिंचवड मतदार संघा संबंधी आचार संहिता भंगाच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या बद्दलची एक बातमी न्यूज पोर्टल आणि एका साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आली होती. हा मजकूर पेड न्यूज सारखा असल्याचे एमसीएमसी समितीच्या निदर्शनास आल्याने त्यांनी यासंबंधीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला पाठविले होते.

त्यानुसार संबंधित निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी १६ फेब्रुवारी रोजी भाजप उमेदवार जगताप यांना नोटीस पाठवत त्यांचे लेखी म्हणणे आयोगाने मागविले होते. उमेदवार अश्विनी जगताप यांनी देखील २० फेब्रुवारीला निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला यासंबंधीचा खुलासा पाठविला आहे. जगताप यांच्या खुलासाची पडताळणी समितीकडून केल्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत असून ही पोट निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. चिंचवड आणि कसबा पेठ मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडीकडून मंत्री, स्टार प्रचारकांचे फौज मैदानात उतरविण्यात आली आहे.

दरम्यान कसबा पेठ आणि चिंचवड मध्ये २६ फेब्रुवारीला मतदान होत असून त्यानंतर २ मार्चला दोन्ही पोटनिवडणुकांचे मतमोजणी होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 211
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.