Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिर्डी मतदार संघातील काही पदाधिकारी हटविले… काही नव्या चेहऱ्यांना संधी
राजकारण

अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिर्डी मतदार संघातील काही पदाधिकारी हटविले… काही नव्या चेहऱ्यांना संधी

जिल्हाप्रमुख खेवरे यांना जबाबदारीतून केले मुक्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2023Updated:22/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई
शिर्डीचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली निवडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला तत्कालीन जिल्हाप्रमुखांकडून हरकत घेण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात रखडलेल्या नियुक्त्याना अखेर मुहूर्त लाभला आहे. विशेष म्हणजे पक्षांतर्गत राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले तर काहींना थेट घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे नव्या निवडींना पक्षात महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकीकडे शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत असताना शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्यांना देखील उत आल्याने अंतर्गत कलह माजला होता. यातून मार्ग काढण्याचे मोठे आव्हान पक्ष नेत्यांसमोर होते. अखेरीस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या नियुक्त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्या बद्दल शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण होते. या नाराजीचा फटका अनेकदा पक्षाला बसला. खेवरे यांच्या आशीर्वादाने पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी देखील निर्माण झाली होती. पक्ष गटातटाच्या राजकारणात विखुरला गेला होता. खेवरे स्वतः दक्षिण लोकसभा मतदारसंघात असताना त्यांच्यावर शिर्डीची दिलेली जबाबदारी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य वाटत नव्हती. तसेच स्वतःच्या राहुरी तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि बहुतांशी संस्थांमध्ये त्यांना पक्षाचा एकही कार्यकर्ता, पदाधिकारी निवडून आणता आला नसल्याचा तसेच उत्तर येतील प्रस्थापित नेत्यांशी ते हात मिळवणी करत असल्याचा त्यांच्यावर सातत्याने आरोप होत होता.

याची दखल घेत जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना उत्तरेच्या (शिर्डी) जिल्हाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आहे. नगर दक्षिणचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांचे विश्वासू असलेल्या खेवरे यांना आता नगर दक्षिणच्या सहसंपर्क प्रमुखपदी नेमण्यात आले आहे. तर त्यांच्या जागेवर दोन जिल्हाप्रमुख नेमण्यात आले आहेत. यामुळे खेवरे यांना जिल्हाप्रमुख पदावरून मुक्त करण्यात आल्याने त्यांच्या निवडक समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असले तरी यामुळे जिल्ह्यात पक्ष वाढीला चालना मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या तीन तालुक्यांसाठी प्रमोद लबडे आणि संगमनेर, अकोला व राहता (शिर्डी) या तीन तालुक्यांसाठी मुजीब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संगमनेरातील शिवसेनेचे जुने जाणते निष्ठावंत पदाधिकारी आप्पा केसेकर यांना जिल्हा संघटक पदी बढती देण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली जिल्हा कार्यकारिणी पद, नाव आणि कार्यक्षेत्र (कंसात) पुढीलप्रमाणे:
जिल्हा संघटक :
आप्पा केसेकर (शिर्डी लोकसभा)
जिल्हाप्रमुख :
प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा तालुका),
मुजीब शेख (संगमनेर, अकोला, राहाता (शिर्डी)).
उपजिल्हाप्रमुख :
महेश नवले (संगमनेर-अकोले),
शेखर दुभैय्या (श्रीरामपूर शहर),
देवीदास सोनवणे (श्रीरामपूर ग्रामीण)
तालुकाप्रमुख :
शिवाजी ठाकरे (कोपरगाव तालुका),
सचिन कोते (राहाता तालुका),
भाऊसाहेब हासे (संगमनेर),
संजय फड (पठार भाग संगमनेर)
राधाकृष्ण बोरकर (श्रीरामपूर तालुका पश्चिम)),
दादा कोकणे (श्रीरामपूर तालुका (पूर्व)),
मनोज मोरे (अकोले तालुका (पूर्व)),
संतोष मुर्तडक (अकोले तालुका (पश्चिम))
विधानसभा संघटक :
असलम शेख (कोपरगाव विधानसभा)
शहरप्रमुख :
सनी वाघ (कोपरगाव शहर),
संजय शिंदे (शिर्डी शहर),
भागवत लांडगे (राहाता शहर),
नितीन नाईकवाडी (अकोले शहर),
अमर कतारी (संगमनेर शहर),
अतुल शेटे (श्रीरामपूर शहर).
शहर समन्वयक :
कलविंदर दडियाल (कोपरगाव शहर).
शहर संघटक :
गणेश होले (राहाता शहर).
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 625
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.