Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठे फेरबदल प्रसाद पवार, जनार्दन आहेर पदमुक्त; अमर कतारींवर पुन्हा संपूर्ण शहराची जबाबदारी
राजकारण

संगमनेर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठे फेरबदल प्रसाद पवार, जनार्दन आहेर पदमुक्त; अमर कतारींवर पुन्हा संपूर्ण शहराची जबाबदारी

मुजीब शेख यांना जिल्हाप्रमुख पदावर बढती.. भाऊसाहेब हासेसह संजय फड (पठार भाग) यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी.. आप्पा केसेकरांना शिर्डीत जिल्हा संघटक पदावर बढती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2023Updated:22/02/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
यापूर्वी असलेली दक्षिण-उत्तर अशी शहरप्रमुखांची विभागणी आता पक्षाच्या आदेशावरून रद्द करण्यात आली असून विद्यमान दक्षिणचे शहराध्यक्ष प्रसाद पवार यांना पदावरून मुक्त करण्यात आले असून शहराचे संपूर्ण जबाबदारी अमर कतारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आठव्यांदा संधी मिळालेले कतारी शिवसेनेचे नवे शहर प्रमुख असतील. पवार यांच्यासह तालुकाप्रमुख असलेले जनार्दन आहेर यांना देखील पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागेवर नवे तालुका प्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे आणि संजय फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फड यांना पठार भागाचे तालुकाप्रमुख म्हणून तर हासे यांना उर्वरित संपूर्ण तालुक्याचे तालुकाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून देण्यात आली आहे. या बदलांकडे गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर या बदलांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.

विशेष म्हणजे नव्या निवडीमध्ये सातत्याने पदाधिकारी निवडीत वरचष्मा असलेले जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याकडून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी काढून त्यांना अहमदनगर दक्षिणच्या सह संपर्कप्रमुख पदी नेमण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षांतर्गत त्यांच्यावर दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपविली असली तरी या नव्या निवडीद्वारे त्यांचे पंख छाटल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खेवरे यांच्या समर्थकात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेतील बंडानंतर संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. काही लोकांनी थेट विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. तर काही लोक मात्र पक्षात राहून पक्ष कमकुवत करण्याचे काम करत होते. त्यातच संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी मतदार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने पक्षात संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख असे दोन गट पडले. त्यातून या नव्या कार्यकारिणीला स्थगिती दिली गेली होती. जिल्हाप्रमुख असलेल्या खेवरे यांनी अहमदनगर दक्षिणचे संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांच्या मध्यस्थीने या नव्या कार्यकारिणीला स्थगिती मिळविली असल्याचे बोलले जात होते. संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख असे दोघांचे सरळ सरळ दोन गट पडल्याने जिल्हाप्रमुखांचा पुतळा देखील संगमनेरात जाळला गेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नव्या बदलांकडे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

नव्या नियुक्त्यांमध्ये तालुकाप्रमुख जनार्दन आहेर आणि शहर प्रमुख प्रसाद पवार यांना पदमुक्त करण्यात आले आहे. पवार यांना जबाबदारी मिळाल्यानंतर देखील पक्षात भरीव काम दाखविता आले नाही. संघटना वाढीतही ते अपयशी ठरले. आहेर आणि पवार यांची पदे काढण्यात आल्याने ते कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. आहेर यांचे पद यापूर्वीच काढण्यात आले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि पिचड यांच्याशी असलेले जवळीक आहेर यांच्या पदावर गच्छंती आणणारी ठरली होती. मात्र नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला मुंबईतून स्थगिती देण्यात आल्याने ते पदावर कायम होते.

नव्या निवडीमध्ये मुजीब शेख यांना जिल्हाप्रमुख पदावर संधी देण्यात आले असून त्यांच्याकडे संगमनेर अकोल्यासह राहता तालुक्याचे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर संगमनेर अकोलेसाठी महेश नवले यांची उपजिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेतील जुने जाणते नेते आप्पा केसेकर यांना थेट जिल्हा संघटकपदी बढती देण्यात आली. पक्षांतर्गत पदे मिळविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाचे संघटन वाढविण्याची, पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 636
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.