Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… दर चार मिनीटाला एका महिलेच्या स्तनाचे कर्करोगाचे निदान तर आठ मिनीटाला एकीचा मृत्यू; समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे: डॉ. एकता वाबळे
सामाजिक

धक्कादायक… दर चार मिनीटाला एका महिलेच्या स्तनाचे कर्करोगाचे निदान तर आठ मिनीटाला एकीचा मृत्यू; समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे: डॉ. एकता वाबळे

इनरव्हील क्लबचा उपक्रम- महिलांमधील कॅन्सरचे मोफत निदान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर :

भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचं निदान होतं. तर, दर आठ मिनिटांना एका महिलेचा त्यामूळे मृत्यू होतो. इतर कोणत्याही कॅन्सरपेक्षा स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण आपल्या देशातील महिलांमध्ये वाढलं आहे. त्यामुळे याबाबत वेळीच जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. हे शिवधनुष्य शिक्षक पेलू शकतील, असे प्रतिपादन स्रीरोगतज्ज्ञ व संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. एकता वाबळे यांनी केले.

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर यांच्यावतीने सर्व वयोगटातील महिलांमधील कॅन्सरचे मोफत निदान या मार्गदर्शन शिबिरात डॉ. वाबळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संध्या खेडेकर उपस्थित होत्या.

वाबळे म्हणाल्या, महिलांच्या कॅन्सरविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. लवकर समजलेला कॅन्सर हा बरा होऊ शकतो. ग्रामीण भागातील स्त्रिया कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या परिस्थितीमध्ये बदल होण्याची गरज आहे. शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या भविष्यातील शिक्षिका आहेत. त्या ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जनजागृती करू शकतात.

कुटुंबातील पुरुषांनी प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाला नवरा-बायको दोघांचीही कॅन्सर विषयक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत भारतीय लोकांची जीवनशैली सुद्धा चंगळवादी झाली आहे. या जीवनशैलीत परिवर्तन आणून व्यायाम व समतोल आहार या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. अस्वस्थ आहार घेतल्यामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वीस टक्क्याने वाढतो, असे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे.

जागतिक आरोग्य संघनटेनेने जाहीर केल्याप्रमाणे वाढतं वय, वाढलेलं वजन, दारुचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन, अनुवांशिकता, रेडिएश, पोस्टमेनोपॉजल सर्जरी आणि तंबाखूचं सेवन अशा विविध कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. ब्रेस्टफीडिंग, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित ठेवणं, मद्यपान टाळणं, तंबाखू न खाणं, हॉर्मोनचा अतिरिक्त वापर टाळणं आणि रेडिएशपासून दूर राहणं अशा काही उपायांमुळे तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करू शकता, असे वाबळे यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. आपल्या भाषणात इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी इनरव्हील क्लबच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील देसले यांनी तर आभार प्रदर्शन संगीता परदेशी यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 460
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.