Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नको, मी आता अपक्षच बरा: आमदार सत्यजित तांबे
राजकारण

काँग्रेस नको, मी आता अपक्षच बरा: आमदार सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अकोले:
काँग्रेस पक्षात आता परत नको, झाला अन्याय आता ठीक आहे, पक्षापेक्षा सामाजिक कार्य करून युवक, पदवीधर, बेरोजगारासाठी कामं करू, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी करीत काँग्रेसमध्ये परत जाण्याचा मार्गाला पूर्णविराम दिला.

कळस बुद्रुक येथे आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अर्थ, बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हे होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रिपाईचे तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, संगमनेर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक आण्णासाहेब ढगे, वीज कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम वाकचौरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे आदी उपस्थित होते.

यावेळी कॉग्रेसचे जेष्ठ नेते सोन्याबापु गुरूजी वाकचौरे यांनी राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ. सुधीर तांबे व आ. सत्यजित तांबे यांचे निलंबन मागे घेऊन पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता वर्तवली असता आमदार तांबे यांनी आता कॉग्रेस नको मी अपक्षच ठिक आहे. लोकांनी मला निवडून दिले आहे. स्टेजवर भाजप, राष्ट्रवादी, रिपाईचे नेते असून आता सामाजिक कार्य करण्याचे संकेत दिले. जिल्हा परिषदमध्ये दहा वर्ष माझ्यावर कैलासराव वाकचौरे यांनी अन्याय केला असून अध्यक्षपदाची संधी हुकवली तसेच दहा वर्ष आम्हांला निधी बाबत कळूनच दिले नाही, अशी मिश्किल टिपणी जोडली.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कळसेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थांनी ढोल ताशाच्या वाद्यांनी तसेच हातानी तयार केलेले सुंदर फुले देऊन स्वागत केले. कळसेश्वर मंदिर व जिल्हा परिषद शाळेचे कौतुक यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास उत्तर देताना आमदार तांबे यांनी अनेक आठवणींना उजाळा देत बेरोजगारी आणि विविध विषयांवर विधानपरिषदेत आवाज उठविण्यार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच राजेंद्र गवांदे यांनी तर सुत्रसंचालन सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी केले तर आभार सागर वाकचौरे यांनी मानले.

यावेळी गटशिक्षण अधिकारीपदी जालिंदर खताळ यांची निवड झाल्याबद्दल, जिल्हा परिषद शाळेचा स्वरित बिबवे या विद्यार्थांने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. सागर वाकचौरे, ज्ञानदेव निसाळ, कळसेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुनीता शेलार, जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक संगीता शेलार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 664
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.