Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना पुन्हा मोठ्या जोमाने उभी करणार : शहरप्रमुख अमर कतारी
राजकारण

संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना पुन्हा मोठ्या जोमाने उभी करणार : शहरप्रमुख अमर कतारी

ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

प्रयोगशील जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार : मुजीब शेख

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेली खरी शिवसेना नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी करणार असल्याचा आशावाद सातव्यांदा झालेले शहर प्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी शहरप्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकारी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील दिवेकर, प्रकाश क्षत्रिय, दीपक साळुंके, जगूभाऊ निकम यांच्यासह रावसाहेब गुंजाळ यांच्यासोबत काम केलेले अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित असल्याने संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकटी नसून नव्या व जुन्या पिढ्या त्यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाल्याने शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण होतं.

कतारी म्हणाले, जुन्या नव्या शिवसैनिकांची पुन्हा एकत्रित मोट बांधू. आपसातील नाराजी, रुसवे-फुगवे दूर करत शहरासह जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढविण्यासाठी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामास लागू. शिवसैनिकांचे संघटन व पक्ष वाढ हा प्रमुख अजंठा असेल.
जिल्हाप्रमुख मुजीब शेख म्हणाले, नव्या जुन्या अशा सर्वांच्या सूचना विचार आणि मार्गदर्शनातून नवीन जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना प्रयोगशील राहणार आहे. पक्षाचे काम करताना पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या प्रामाणिक शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील.

यावेळी संपर्क प्रमुख नरेश माळवे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, विकास डमाळे, इम्तियाज शेख, शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंके, रंगनाथ फटांगरे, गोविंद नागरे, सुदर्शन इटप, अजिज मोमीन, शोएब शेख, योगेश खेमनर, राजू सातपुते, एकनाथ खेमनर, माधव फुलमाळी, सचिन साळवे, परवेज शेख, असिफ तांबोळी, विजय भागवत, सुमित चायल, व्यापारी आघाडीचे संभव लोढा यांच्यासह विविध अंगीकृत समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत अक्षय गुंजाळ यांनी केले. प्रास्ताविक प्रथमेश बेल्हेकर यांनी केले. तर भाऊसाहेब असे यांनी आभार मानले.

माजी उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुख रावसाहेब गुंजाळ नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पक्षाच्या संकट काळात ज्येष्ठ आणि नव्या शिवसैनिकांनी एकत्र येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक दिलाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. सर्वांची एकजूट दाखवत यापुढे भक्कमपणे काम करण्याची वेळ आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 300
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.