Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधायक : नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉक्टरांनी गिरविले आर्थिक साक्षरतेचे धडे; क्रिप्टो चा खेळ संपला, भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा : कडलग 
सामाजिक

विधायक : नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळेत डॉक्टरांनी गिरविले आर्थिक साक्षरतेचे धडे; क्रिप्टो चा खेळ संपला, भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा : कडलग 

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
क्रिप्टोचा खेळ संपलेला आहे, कोणतीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आहे, त्यात गुंतवणूक करण्याऐवजी सामान्य व्यक्तीला कोट्याधीश करण्याची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करा व आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असा सल्ला अन्फ्फि (AMFI) एमएफडी सुनील कडलग यांनी दिला.

नारायणगाव येथील हॉटेल सचिन एक्झिक्यूटिव्ह कॉन्फरन्स हॉलमध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे शनिवारी आयोजित नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले होते. डॉ. निलेश थोरात, एनजे वेल्थचे शुभम कोळी, मनिष पवार, डीएसपी म्युच्युअल फंडाचे पियुष कासट उपस्थित होते.

कडलग म्हणाले, जानेवारी २०२३ मध्ये ४० लाख कोटींचा असलेला म्युच्युअल फंड उद्योग येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये शंभर लाख कोटींचा होण्याची शक्यता आहे. शिवाय सद्यस्थितीत जगात पाचव्या क्रमांकाला असलेली भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या काही वर्षांत तिसऱ्या क्रमांकाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मंदीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भारत जगामध्ये ब्राईट स्पॉट ठरतो आहे. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले. म्हणूनच परदेशातूनही गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात भारतात येत आहे. कोरोनासारखी आपत्कालीन परिस्थिती कधीही निर्माण झाल्यास प्रत्येकाकडे आपत्कालीन निधीची व्यवस्था असायला हवी, त्यासाठी म्युच्युअल फंडातील लिक्वीड फंडस् उपयुक्त ठरू शकतो.

भारतीय बँकांमध्ये साधारणतः १५० ते १७० लाख कोटींच्या बचत ठेवी आहेत. त्या तुलनेत म्युच्युअल फंडात मात्र फक्त २० टक्केच रक्कम आहे. महागाईच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाकडे सद्यस्थितीत गुंतवणुकीचा कल वाढत आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रति महिना १४००० कोटींच्या एसआयपीचा ओघ शेअर बाजारात येत आहे म्हणून शेअर बाजाराला आता परदेशी गुंतवणूकदारांच्या दयेवर अवलंबून राहण्याचे कारण राहिलेले नाही हे मागच्या वर्षभरात सिद्ध झालेले आहे.

याप्रसंगी डॉ. अनिल भोसले, डॉ. उत्तमराव घोरपडे, डॉ. अविनाश पोथारकर, डॉ. प्रवीण उगले, डॉ. अजित काकडे यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग, शुभम कोळी, पियुष कासट यांनी उत्तरे दिली. डॉ. मुक्तांजली पोथरकर यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले यांनी सन्मानचिन्ह देऊन सुनील कडलग यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी डॉ. निलेश थोरात यांनी तर सूत्रसंचालन डॉ. आनंद सराईकर यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. कविता भोसले यांनी केले. डॉ. शशिकांत गुळवे, डॉ. मनोहर कवडे, डॉ. राजेश धुमाळ, डॉ. रामदास उदमले, डॉ. सुजाता गोर्डे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 460
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.