Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कलाटेंच्या बंडखोरीमुळे भाजपाने चिंचवड राखले; अश्विनी जगताप यांचा ३६०९१ मतांनी विजय
राजकारण

कलाटेंच्या बंडखोरीमुळे भाजपाने चिंचवड राखले; अश्विनी जगताप यांचा ३६०९१ मतांनी विजय

कसबा गेले चिंचवड राखले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असताना चिंचवडमध्ये मात्र महाविकास आघाडीतील फुटीमुळे भाजपला मोठे यश मिळविता आले. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तब्बल ३६०९१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

कसबा पेठ मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील उमेदवार न देता भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. याचा मोठा फटका भाजपला बसला असताना चिंचवड मध्ये मात्र भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड मधून निवडणूक लढविण्यासाठी राहुल कलाटे इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. काटे आणि कलाटे यांच्यातील मत विभागणीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याने भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय सुकर झाला. कराटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी अजित पवार, सचिन आहेर अशा बड्या नेते मंडळींनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र कलाटे निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले होते.

कलाटे यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात तिरंगी लढत झाल्याचे दिसून आले. तरीदेखील जगताप यांनी तब्बल ३६०९१ मतांनी मोठा विजय मिळवला आहे. “हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली काम आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे” अशी प्रतिक्रिया विजयानंतर अश्विनी जगताप यांनी दिली.

निवडणुकीतील अंतिम आकडेवारी अशी;
अश्विनी जगताप – १३५४३४
नाना काटे – ९९३४३
राहुल कलाटे – ४४०८२

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 366
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.