Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरातांनी सभागृहात केली ही मागणी म्हणाले… अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करा
राजकारण

बाळासाहेब थोरातांनी सभागृहात केली ही मागणी म्हणाले… अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करा

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
कोरोनाच्या संकट काळात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्या तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्यांची मानधन वाढ तात्काळ करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे प्रश्न मांडताना ते म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका ह्या ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत चांगले काम करत आहे. कोरोनाच्या संकट काळात या सर्वांनी चांगले काम केले. हे सर्व राज्याने आणि देशाने पाहिले आहे. त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. मानधन वाढीबाबत सर्व विधानसभेतील सदस्य अनुकूल आहेत.

या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांची अर्थव्यवस्था चांगली व्हावी. त्यांचे कुटुंब चांगले व्हावे, हे प्रत्येकाला वाटते आहे. म्हणून त्यांच्या मानधनात तात्काळ वाढ झाली पाहिजे. मानधन वाढीबाबत या महिला भगिनींनी अनेक वेळा आंदोलने केली, मोर्चे काढले.

मागील आठवड्यामध्ये आझाद मैदानावर कॉ. मिलिंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी संघटनांचा भव्य मोर्चा झाला. मात्र सरकारकडून दिलेले उत्तरही समाधानकारक नाही. या विभागाचे मंत्री महोदय संवेदनशील आहेत. त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन या महिला भगिनींना सरकारकडून जास्तीत जास्त मानधन वाढ करण्यासाठी सभागृहाला आश्वासित करून प्रत्यक्ष ही मानधन वाढ दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित असून कोरोना संकटानंतर डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांचा कौतुक सोहळा झाला होता. यावेळी आमदार थोरात यांनी या प्रश्नासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून विधानसभेतही हा प्रश्न आग्रहीपणे मांडू, असे सांगितले होते. आज आमदार थोरात यांनी अत्यंत आक्रमकपणे अंगणवाडी सेविकांच्या मानधन प्रश्नाबाबत सरकारला घेरले. थोरात हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून त्यांनी मांडलेल्या प्रश्नामुळे सरकार नक्कीच तातडीने अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत अपेक्षित निर्णय घेईल, असा आशावाद राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांमध्ये निर्माण झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 182
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.