Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाट्यमय घडामोडीत जिल्हा बँक महाविकास आघाडीच्या हातातून निसटली; अध्यक्षपदी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड
राजकारण

नाट्यमय घडामोडीत जिल्हा बँक महाविकास आघाडीच्या हातातून निसटली; अध्यक्षपदी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड

बहुमत असतानाही महाविकास आघाडीला रोखण्यात विखे पिता पुत्र यशस्वी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर :
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी घडवून आणलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बँक महाविकास आघाडीच्या ताब्यातून निसटली आहे. अनपेक्षितपणे आघाडीच्या मतांची फोडाफोडी करत भारतीय जनता पक्षाने बँक आघाडीच्या ताब्यातून खेचून आणली. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी बुधवारी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. शेळके यांच्या रूपाने अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर माधवराव कानवडे यांच्या रूपाने उपाध्यक्षपद काँग्रेसकडे होते. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे बँकेवर वर्चस्व असल्याने शेळके यांच्या रिक्त जागी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीने मंगळवारी रात्री माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक दहा काँग्रेसकडे तीन विखे गट व भाजपकडे प्रत्येकी तीन आणि शिवसेनेकडे एक असे पक्षीय बलाबल आहे. शेळके यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादीची सदस्य संख्या नऊवर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे संख्याबळ बारावर असल्याने महाविकास आघाडीला यश निश्चित मानले जात होते. त्यामुळे बुधवारी अध्यक्षपदासाठी घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समाज माध्यमांवर त्यांच्या बिनविरोध निवडीचे व अभिनंदनचे मेसेज व्हायरल झाले होते.

मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळी भाजपकडून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत काय घडणार याची उत्सुकता वाढली होती. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडवून आणल्या. घुले आणि कर्डिले यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी जाहीर केला.

भाजपचे शिवाजी कर्डिले यांना दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. एक मत बाद झाले. त्यामुळे अवघ्या एका मताच्या फरकाने बँक महाविकास आघाडीच्या ताब्यातून निसटली आणि भाजपाच्या ताब्यात गेली. बँकेच्या राजकारणात विखे पिता पुत्रांची खेळी यशस्वी ठरली. त्यांनी अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे पवार-थोरात यांची गणित फिस्कटली. निकालानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बँकेत येत अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा सत्कार केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 794
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.