Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन संघर्षमय राहिले; शिक्षक नेते हिरालाल पगडाल
सामाजिक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन संघर्षमय राहिले; शिक्षक नेते हिरालाल पगडाल

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 14, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. मोठा संघर्ष करत त्यांनी संगमनेर तालुक्यात विविध संस्था उभ्या करत त्यातून तालुक्यात समृद्धी आणली असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते, टिडीएफ शिक्षक संघटनेचे राज्य सचिव हिरालाल पगडाल यांनी केले.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात पगडाल बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर सहकारातील जेष्ठ नेते मधुकर नवले, अरुण कडू, उद्योजक राजेश मालपाणी, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, सुरेश थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

पगडाल म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी हॉस्पिटल, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. विविध संस्थांची उभारणी करणाऱ्या भाऊसाहेबांनी वयाच्या पंच्याहत्तरीत दंडकारण्य अभियाना सारखी लोक चळवळ निर्माण करणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी सातत्याने समाजासाठी काम करण्याचा ध्यास घेतला होता. त्यांचे जीवन अखेरपर्यंत संघर्षमय राहिले.

संगमनेर-अकोले तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे संगमनेर-अकोले तालुक्याला भंडारदरा धरणातून हक्काचे 30 टक्के पाणी मिळाले. सहकारातून समृद्ध झालेला हा एकमेव तालुका आहे. निळवंडे धरणाचे पाणी ज्यावेळी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाईल, तेव्हा दादांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

माजी आमदार तांबे म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी समाजचिंतन दूरदृष्टी व समाजाविषयीच्या तळमळीतून तालुक्यात विकासाचा पाया घातला. आणि आज विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा देशासाठी विकासाचे मॉडेल ठरला.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले, स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त संगमनेर दूध संघात 2 मेगा वॅट सोलर प्रोजेक्टसह तालुक्यातील 250 डेअरीमध्ये असलेल्या बल्क्युलरला सोलर योजना राबविण्यात येणार आहे.

प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 264
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

असंघटित कामगार: श्रेय लाटणाऱ्यांवर संजय कोल्हे यांची घणाघाती टीका; सत्तेचा दुरुपयोग करून फोटो चिटकवण्याचे राजकारण दुर्दैवी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी…

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.