Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज ठाकरे आजच्या मेळाव्यात कोणावर तोफ डागणार! याकडे राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष…
राजकारण

राज ठाकरे आजच्या मेळाव्यात कोणावर तोफ डागणार! याकडे राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2023Updated:22/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई
आता ट्रेलर नाही तर गुढीपाडव्याला थेट चित्रपटच दाखविणार, असे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यात दिले होते. त्यामुळे आज, बुधवारी होणाऱ्या गुढीपाढव्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणावर तोफ डागणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर राज ठाकरे यांचा गुढी पाडवा मेळावा होत असतो. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच या मेळ्याव्याचीही जय्यत तयारी केली जाते. मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक पदाधिकारी या मेळाव्याला हजेरी लावत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मेळावा महत्त्वाचा असतो. बुधवारी संध्याकाळी होत असलेल्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणावर टीका करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुका कधीही लागू शकतात. आपण सत्तेपासून दूर नाही. त्यामुळे तयारीला लागा. आपली सत्ता येणार आहे, असे फर्मान राज ठाकरे यांनी ठाणे येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांसाठी जारी केले होते. राज्यात काही महिन्यांपूर्वीच सत्ता बदल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी देखील नुकतीच पूर्ण झाली आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. सत्ता संघर्षाची लढाई कोण जिंकणार याचा निर्णय येणे बाकी असतानाच मनसेचा मेळावा होत असून या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत लागू केली आहे. मुंबईचा कायापालट करण्यासाठी विविध योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे यातील कोणत्या मुद्द्यावरुन राज ठाकरे हे सरकारला घेरतील ती सरकारच्या भूमिकेचे स्वागत करतील हे बघावे लागेल.

याशिवाय विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये कलगीतुरा सुरु असतो. शिवसेनेच्या दोन गटातही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतात. त्यावर राज ठाकरे नेमके काय भाष्य करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याचीही सध्या चर्चा सुरु आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 264
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.