Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभा परिसरात राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा: आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

विधानसभा परिसरात राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा: आमदार बाळासाहेब थोरात

नेत्याच्या फोटोला चपलांनी मारण्याचा प्रकार विकृत, निंदनीय व लोकशाहीस मारक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेच्या परिसरात राहुल गांधींच्या बॅनरबाबत जी विकृत घटना घडली ती विधानसभेच्या इतिहासातील एक निंदनीय व दुर्दैवी घटना आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मात्र हे लक्षात ठेवावे की, आज आमच्या वरीष्ठ नेत्यांबाबत हे घडले. तुमच्याकडेही वरीष्ठ नेते आहेत, तुमच्या नेत्यांबाबत असे घडू शकते, याची जाण असली पाहिजे. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

असे जर झाले नाही तर तुमच्या कार्यकाळात अशा घटना घडूनही आपण कारवाई केली नाही हे इतिहासात काळ्या अक्षरात लिहिले जाईल. आता आम्हाला आपल्याकडूनच न्याय व योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे. याबाबतीत आपणांस वारंवार भेटून व मागणी करुनही कोणताही निर्णय घेतला नाही हे चुकीचे आहे. या विकृत घटनेबाबत जर निर्णय झाला नाही तर, ही कृती दुसऱ्याही राजकीय नेत्यांच्या बाबतीत होवू शकते हे लक्षात घ्यावे आणि ते दुर्दैवी ठरू शकते. म्हणून याबाबतीत आपण निर्णय घ्यावा जो पुढील काळासाठी व लोकशाही प्रणालीसाठी महत्वाचा आहे.

राज्यात आज जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. अवकाळी पाऊस, पीकांचे बाजारभाव यासारखी अनेक संकटे शेतकऱ्यांसमोर असून या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी व तातडीने मदत मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येते. विरोधीपक्ष जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम या आंदोलनातून करत असतो. आज आम्ही आंदोलने करीत आहोत, यापूर्वी आपणही अशा प्रकारची आंदोलने केली आहेत, त्यात काहीही चुकीचे नाही. विरोधकांना पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाही प्रणालीने हा अधिकार दिलेला आहे. पण दोन दिवसापूर्वी झालेला प्रकार अयोग्य आहे तो पुन्हा होऊ नये यासाठी कारवाई करुन एक संदेश देण्याची आवश्यकता आहे, असेही थोरात म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 324
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांदरफळ बुद्रुक गावाच्या शिवारातील बाजारतळावर नवरात्रोत्सवानिमित्ताने…

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.