Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात रामनवमी मिरवणूक ठरली लक्षवेधी; आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागाने वाढली रंगत
सामाजिक

संगमनेरात रामनवमी मिरवणूक ठरली लक्षवेधी; आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागाने वाढली रंगत

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2023Updated:31/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी राम नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांच्या सहभागामुळे शोभा यात्रेची रंगत आणखी वाढली होती.

श्रीराम नवमी निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनी-मातृशक्ती आयोजित शोभायात्रेला अभिनव नगर मधील श्रीराम मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता हनुमान चालीसा व आरतीने सुरुवात करण्यात आली. गीता परिवाराच्यावतीने यावेळी हनुमान चालीसांचे वाटप करण्यात आले.

बस स्थानक परिसरात रामराज्य प्रतिष्ठानने केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी संगमनेरकरांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत सुरुवातीला सनई चौघडे, घोडे, उंट, लहान मुले श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, शबरी वेशभूषेत श्रीराम पंचायत आकर्षक बग्गीत बसले होते. पारंपरिक वाद्य शिवजन्म भुमि जुन्नर महाराणा ढोल ताशा पथक, साईदर्शन डि.जे., गजराज डि. जे. पुढे तरुणांनी श्रीरामांच्या गाण्यांवर ठेका धरला होता.

शोभायात्रेत भव्य- दिव्य धार्मिक देखावे, भव्य श्रीरामचंद्र मूर्ती, “भव्य महाबली हनुमान” लहान मुलांसाठी आकर्षण ठरले होते, महाबली हनुमान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आदीवासी नृत्य, मर्दानी खेळ व मल्लखांब प्रात्याषिके चौका-चौकात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या संगमनेरकरांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रभू श्रीराम यांच्या जयघोषाने संगमनेर नगरी दुमदुमली होती. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सर्वत्र तसेच मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री दहा वाजता सय्यद बाबा चौकात शोभायात्रा असताना पोलिसांनी वाद्य बंद केले.

आजी-माजी मंत्र्यांसह विद्यमान आमदारांचा सहभाग

राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी उपस्थित होते. याच ठिकाणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी देखील मिरवणुकीत हजेरी लावली. मंत्री विखे पाटील आणि आमदार सत्यजित तांबे काही काळासाठी एकत्र होते. दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मारुती मंदिर आणि पंजाबी कॉलनी येथे एकत्रित आरती करत दोघांनीही हातात- हात घेवून शोभायात्रेत सहभाग घेतला. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सय्यद बाबा चौकात मिरवणुकीत सहभाग घेतला होता. रात्री चंद्रशेखर चौक येथील पुरातन मारुती मंदिर व श्रीराम मंदीर येथील रामभक्ती रंग कार्यक्रमात विखे-तांबे सहभागी झाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 970
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.