Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा शुभारंभाचा धडाका पंधरा प्रभागांमध्ये एकाच वेळी पंधरा शाखांचा होणार शुभारंभ
राजकारण

संगमनेर शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा शुभारंभाचा धडाका पंधरा प्रभागांमध्ये एकाच वेळी पंधरा शाखांचा होणार शुभारंभ

संपर्कप्रमुख, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी राहणार उपस्थित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्य पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू झाली आहे. संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाची कार्यकारिणी नव्याने जाहीर झाल्यानंतर “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत नवे पदाधिकारी कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शाखा बांधणीचा धडाका सुरू झाला असून एकाच वेळी १५ प्रभागांमध्ये १५ शाखांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली.

संगमनेरमध्ये एकाच दिवसात पंधरा शाखांचा शुभारंभ प्रथमत:च होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना बांधणीला संगमनेरमध्ये वेग आल्याचे मानले जाते. या संदर्भात कतारी म्हणाले, आगामी काळात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनात्मक बांधणी नव्याने करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करण्याचा संकल्प केला आहे.

शिवसेनेत झालेल्या गद्दारीचा राज्यासह शिर्डी लोकसभेतदेखील प्रभाव पडला. विद्यमान खासदारांनी ठाकरेंसोबत केलेली गद्दारी निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. पक्ष नेतृत्वानेदेखील शिर्डी लोकसभेतील सर्व सूत्र माजी मंत्री लोकसभा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्याकडे दिली. त्या अनुषंगाने त्यांनी धाडसी व प्रभावी निर्णय घेत संघटनेत फेरबदल केले. त्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सर्व नव्या-जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेत संगमनेर शहर, तालुक्यात घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व संजय फड यांच्या सूचनेनुसार कतारी यांनी शहरातील सर्वच्या सर्व पंधरा प्रभागात शाखा उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला असून पंधरा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, यांच्या माध्यमातून शहरात संघटनात्मक तसेच लोकहिताचे काम करण्यासाठी शहर शिवसेना काम करणार असल्याचे व शहरात आणखी शाखांचा विस्तार केला जाणार असून पुढील आठवड्यामध्ये शहर शिवसेनेच्या नेहरू गार्डन जवळील नूतन कार्यालयाचा देखील शुभारंभ होणार असल्याचे ते म्हणाले.

बुधवारी (५ एप्रिल) सकाळी १० वाजता रंगारगल्ली येथून शाखांचा शुभारंभ माजी मंत्री, संपर्कप्रमुख बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, विधानसभा संपर्क प्रमुख अजय व्हनोळे, युवासेना संपर्क प्रमुख मितेश साटम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शिवसेना शाखा वाढीसाठी शहर समन्वयक असिफ तांबोळी, शहर संघटक दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, उपशहर प्रमुख विकास डमाळे, उपशहर प्रमुख दीपक वन्नम, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख तसेच युवा सेना, शिवसेना महिला आघाडी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी व विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांचे सहकार्य मिळाले असल्याचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 420
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.