Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्येष्ठांना सन्मान देणारी संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देईल: प्राचार्य भगवान जोशी
सामाजिक

ज्येष्ठांना सन्मान देणारी संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देईल: प्राचार्य भगवान जोशी

इनरव्हील आधारवड कृतज्ञता समारंभ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर: उभी हयात सामाजिक योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. ज्या संस्कृतीमध्ये संवेदनशीलतेने ज्येष्ठांना सन्मान दिला जातो, ती संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य भगवान जोशी यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या ५० नागरिकांना आधारवड कृतज्ञता समारंभात छत्री व काठी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोमनाथ कळसकर गुरुजी होते. व्यासपीठावर इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या अध्यक्ष रचना मालपाणी, अध्यक्ष वृषाली कडलग, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी ज्योती पलोड आदी उपस्थित होते. अनिता कोदे व विजय कोदे यांनी छत्री व काठी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

जोशी म्हणाले, ज्येष्ठांसाठी ‘म्हातारा’ हा शब्द वापरला जातो. मात्र ते म्हातारे नसून तेजस्वीपणे चकाकणारे ‘महातारे’ आहेत. या महाताऱ्यांच्या सत्कार्यातून जी ऊर्जा निर्माण होते, त्यावर जग चालते. या ज्येष्ठांची संवेदनशीलतेने दखल घेणाऱ्या इनरव्हील क्लबचे कार्य गौरवास्पद आहे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, इनरव्हीलने ज्येष्ठ नागरिकांची घेतलेली दखल ही स्वार्थ विरहित सेवा आहे. समाजासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हीलने जागतिक पातळीवर केलेले सामाजिक कार्य गौरवास्पद ठरले आहे.

रचना मालपणी म्हणाल्या, जेष्ठांची सेवा करण्याचे सदभाग्य इनरव्हीलला मिळाले आहे. प्रास्ताविक भाषणात इनरव्हीलच्या अध्यक्ष वृषाली कडलग यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ आहेत. ज्या देशाला अध्यात्मिक अधिष्ठान असते त्या देशात ज्येष्ठांचा सन्मान होतो व ती संस्कृती जगामध्ये उन्नत ठरते असे त्या म्हणाल्या.

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात तर सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमप्रसंगी इनरव्हीलच्या सीमा अत्रे, ज्योती कासट, डॉ. दीप्ती राजुस्कर, संध्या मालपाणी, वैशाली खैरनार, शुभलक्ष्मी बेलापूरकर, शिल्पा नावंदर, सुनिता गांधी आदी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन नंदकिशोर बेल्हेकर यांनी तर आभार नवले सर यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 412
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.