मुंबई| महाराष्ट्र संवाद न्यूज
गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त लाभला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिर्डी लोकसभेतील युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून जिल्हा युवा अधिकारीपदी अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता) यांची फेरनिवड करण्यात आली.
युवा सेनेच्या नव्या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून, सहा महिन्यांनंतर पदाधिकार्यांचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस पाठविलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली असून पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

युवा सेनेचे नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
(पद, पदाधिकार्याचे नाव आणि कार्यक्षेत्र)
जिल्हा युवा अधिकारी:
अमित रामकिसन चव्हाण (संगमनेर, अकोले, राहाता)
जिल्हा चिटणीस:
संदेश एखंडे (अकोले)
उप-जिल्हा युवा अधिकारी:
वैभव अभंग (संगमनेर)
संदीप विघे (राहाता)
सुनील गिते (अकोले)
उप-जिल्हा समन्वयक:
रवींद्र नंदू कानकाटे (संगमनेर)
विधानसभा युवा अधिकारी:
अमोल रामचंद्र डुकरे (संगमनेर विधानसभा)
केतन भांगरे (अकोले विधानसभा)
गणेश खेमनर ( राहाता विधानसभा)
तालुका युवा अधिकारी:
योगेश किसन खेमनर (संगमनेर पठार भाग)
अक्षय गुंजाळ (संगमनेर)
गणेश अस्वले (अकोले शहर)
राहुल लांडे (अकोले ग्रामीण)
किरण जपे (राहाता उत्तर)
प्रताप निर्मळ (राहाता दक्षिण)
तालुका समन्वयक:
अक्षय बळीराम बिल्लाडे
प्रवीण कातोरे
उप तालुका युवा अधिकारी:
सागर अशोक भागवत (संगमनेर)
सचिन साळवे (संगमनेर तालुका)
फिरोज रामसिंग कतारी
जनार्दन नागरे (संगमनेर पठार भाग)
गुलाब कोकाटे (संगमनेर पठार भाग)
उदावंत स्वप्नील राजधन
स्वप्नील एखंडे
काशिनाथ बेनके
महेश शेलार
युवराज बांगरे
गोकुळ ठुबे
शहर युवा अधिकारी:
गोविंद रामराव नागरे (संगमनेर शहर)
महेश हासे
अमर गायकवाड (शिर्डी शहर)
शेखर जमधडे (राहाता शहर)
उप-शहर युवा अधिकारी:
फैसल चांद सय्यद (संगमनेर शहर उपनगर)
अक्षय रमेश गाडे
राम एखंडे
विकास सोमवंशी (राहाता शहर)
अमोल गायखे (शिर्डी शहर)
सोशल मीडिया समन्वयक:
विशाल रंगनाथ वाकचौरे
विधानसभा समन्वयक:
अमोल राजाराम शेळके
उपतालुका समन्वयक:
ज्ञानेश्वर संतू विन्नर
शहर चिटणीस:
अरुण किसन गोंदके
शाखा युवा अधिकारी:
सागर बेनके
शाखा समन्वयक:
रामदास काळे
उप-शाखा युवा अधिकारी:
शशिकांत बेनके
विधानसभा चिटणीस:
प्रकाश गायकवाड
तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा शासकीय विश्रामगृहामध्ये सत्कार…
युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी फेर निवड झालेल्या अमित चव्हाण यांच्यासह संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड, शहर संघटक दीपक साळुंके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

