शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज
काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना एसएमबीटी रुग्णालयातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
रामनवमी उत्सवावेळी शिर्डीमध्ये झालेल्या पाळणा दुर्घटनेमध्ये साळवे आणि साबळे या सर्वसामान्य कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री थोरात यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी तातडीने धामणगाव येथील एसएमबीटी या सेवाभावी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे. या दोन्ही कुटुंबीयांच्या भेटीवेळी थोरात यांच्यासोबत डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले, लता डांगे, ॲड. पंकज लोंढे, उमेश शेजवळ, नितीन शेजवळ, नितीन धीवर, सचिन गायकवाड, नाना त्रिभुवन, साई पटाले, नवीन शेजवळ, रवी शेजवळ, समीर शेख, सुमित शेळके, समीर शेख, संतोष वाघमारे, विक्रांत दंडवते, अविनाश दंडवते, उत्तमराव मते, अविनाश शेजवळ, योव्हान गायकवाड, अमृत गायके आदी उपस्थित होते.

