Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाजार समिती सामना ठरला; आजी-माजी महसूल मंत्री थोरात-विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार!
राजकारण

बाजार समिती सामना ठरला; आजी-माजी महसूल मंत्री थोरात-विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार!

18 जागांसाठी 45 जण निवडणूक मैदानात: 'हे' उभे ठाकले एकमेकांविरोधात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आजी-माजी महसूल मंत्री थोरात-विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकही जागा होऊ शकलेली नाही.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18, महिला राखीव गटात 4, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी अडते मतदार संघातून 6 व हमाल मापारी मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. जवळपास सर्वच जागांवर विरोधकांना उमेदवार मिळाल्याने एकही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. काही जागांवर सरळ लढत होत आहे. विद्यमान अध्यक्ष शंकर खेमनर यांच्या विरोधातील नाराजी विरोधकांना कितपत तारते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मंत्री विखे यांनी भाजपकडून महत्त्वाचे नेते निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे या नेत्यांचे भवितव्य पणाला लागले असल्याचे दिसते.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एक हाती वर्चस्व आहे. बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी मध्यंतरी थोरात यांचा हात सोडत विखेंच्या मदतीने कमळ हाती घेत भाजपचे तालुकाध्यक्ष पद मिळविले. त्यामुळे सत्ता बदलानंतर महसूल मंत्रीपदासोबत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये व्यक्तिगत लक्ष घालत तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांना बळ देण्याचे काम चालविले आहे. या पार्श्वभूमीवर कानवडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीत विरोधक महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात यांच्या साम्राज्याला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे. असे असले तरी भाजपचे तालुकाध्यक्ष असलेल्या आणि बाजार समितीचे उपसभापती पद भूषविलेल्या कानवडे यांनी मात्र निवडणुकीतून माघार घेतली आहे.

छाननीनंतर निवडणूक रिंगणात 99 उमेदवार शिल्लक राहिले होते माघारीपर्यंत यातील बहुतेकांनी माघार घेतल्याने शेवटच्या दिवशी 18 जागांकरिता 45 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.

मतदार संघनिहाय उमेदवार खालील प्रमाणे:-
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघ शेतकरी प्रतिनिधी:-
डॉ. अशोक वामनराव इथापे, सुरेश रामचंद्र कान्होरे, सतीश विश्वनाथ खताळ, शंकर हनुमंता खेमनर, ॲड. श्रीराम अरविंद गणपुले, गीताराम दशरथ गायकवाड, विकास शांताराम गायकवाड, मनीष सूर्यभान गोपाळे, भीमराज नामदेव चत्तर, भाऊराव रामराव देशमुख, योगेश मधुकर देशमुख, कैलास बाळासाहेब पानसरे, काशिनाथ रभाजी पावसे, कचरू भाऊपाटील वारुक्षे, रमेश नामदेव शिंगोटे, बाळासाहेब लहानु शेटे, यशवंत कारभारी शेळके व विजय विठ्ठल सातपुते.

सोसायटी मतदार संघ महिला राखीव:-
अंजनाबाई पुंजा दिघे, रोहिणी किशोर निघूते, दिपाली भाऊसाहेब वर्पे व रुक्मिणी शिवाजी साकूरे.

सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:-
शरद ज्ञानदेव गोर्डे व सुधाकर पुंजाजी ताजने.

सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:-
अनिल शिवाजी घुगे व संदीप भाऊसाहेब घुगे.

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ:-
जनार्दन म्हातारबा आहेर, संतु गंगाधर कुटे, दत्तात्रय केशव गुंजाळ, संदीप भास्करराव देशमुख, अरुण तुळशीराम वाघ व सखाहरी बबन शरमाळे.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
संजय दादा खरात व महादू जानकु गोंधे.

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग व संजय दत्तात्रय पावसे.

व्यापारी मतदारसंघ:-
मनसुख शंकर भंडारी, अजीम गुलाम हुसेन शेख, खलील नवाब शेख, नबी पापा शेख, निसार गुलाब शेख व रफिक पापा (बेपारी) शेख.

हमाल मापाडी मतदारसंघ:-
सचिन बाळकृष्ण कर्पे, महेंद्र रखमा गुंजाळ व सोमनाथ तुकाराम दिघे.

भाड्याने देणे आहे
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 868
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.