महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी गटातील जर कोणी उमेदवार शिवसेनेच्या नावाने मतं मागत असेल तर त्याला मतदान करू नका. शिवसेना अशा उमेदवारांचा लवकरच बंदोबस्त करेल. मतदारांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांनी केले आहे.
शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शेतकरी विकास मंडळ आणि जनसेवा मंडळामध्ये लढत होत आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाने आपले उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी उमेदवारांचे चिन्ह कप बशी असून शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन घोलप यांनी केले आहे.
महाविकास आघाडीला मतदान करतानाच घोलप यांनी विरोधी पक्षाकडून उभ्या असलेल्या उमेदवाराकडून शिवसेनेच्या नावावर मते मागितली जात असल्याचे स्पष्ट करत शिवसेना मतदारांनी अशा उमेदवारांना दूर करण्याचे आवाहन करत अशा उमेदवारावर पक्ष लवकरच कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पदावरून दूर केल्यानंतर महाविकास आघाडीचे संकेत न पाळता शिवसेनेत बंडखोरी करत एका उमेदवाराने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाकडून उमेदवारी केली आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. कारवाई मध्ये संपर्कप्रमुख घोलप यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

