अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. अरुण वाघ आणि सखाहरी शरमाळे यांचा विजयी उमेदवारास समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या जनार्दन आहेर आणि संदीप देशमुख यांचा पराभव केला आहे.
या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ चार वरून 6 वर गेले आहे तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन करपे थोरात यांच्या समर्थक मानले जातात. विशेष म्हणजे निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही संगमनेरमधून मंत्री विखे यांच्यासाठी ही मोठी नामुश्कीची बाब ठरली आहे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गट:- (एकूण मतदान 1387 झालेले मतदान 1368 – 98.63%) बाद मते –
जनार्दन म्हातारबा आहेर (जनसेवा मंडळ- 480)
संतु गंगाधर कुटे (अपक्ष-
दत्तात्रय केशव गुंजाळ (अपक्ष-
संदीप भास्करराव देशमुख (जनसेवा मंडळ- 374)
अरुण तुळशीराम वाघ (शेतकरी विकास मंडळ- 841 विजयी)
सखाहरी बबन शरमाळे (शेतकरी विकास मंडळ- 834 विजयी)
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
संजय दादा खरात (शेतकरी विकास मंडळ- 930 विजयी)
महादू जानकु गोंधे (जनसेवा मंडळ- 399)
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग (शेतकरी विकास मंडळ- 936 विजयी)
संजय दत्तात्रय पावसे (जनसेवा मंडळ- 390)
व्यापारी मतदारसंघ:- (एकूण मतदान 403 झालेले मतदान 371 – 92%) बाद मते –
मनसुख शंकर भंडारी (शेतकरी विकास मंडळ- 336 विजयी)
अजीम गुलाम हुसेन शेख (जनसेवा मंडळ- 33)
खलील नवाब शेख (जनसेवा मंडळ- 21)
नबी पापा शेख (अपक्ष- 01)
निसार गुलाब शेख (शेतकरी विकास मंडळ- 339 विजयी)
रफिक पापा (बेपारी) शेख (अपक्ष-01)
हमाल मापाडी मतदारसंघ:- (एकूण मतदान 147 झालेले मतदान 147 – 100%) बाद मते –
सचिन बाळकृष्ण कर्पे (अपक्ष- 90 विजयी)
महेंद्र रखमा गुंजाळ (शेतकरी विकास मंडळ- 52)
सोमनाथ तुकाराम दिघे (जनसेवा मंडळ- 01)
(जसजसे निवडणूक निकाल हाती येतील तसतसे आम्ही हे वृत्त अपडेट करीत आहोत)

