Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाकरी फिरवणार: स्वतः घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी घेतली निवृत्ती
राजकारण

भाकरी फिरवणार: स्वतः घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी घेतली निवृत्ती

निर्णय मागे घेण्यासाठी कार्यकर्ते अडून बसले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2023Updated:02/05/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची मोठे घोषणा केली आहे. तसेच या सोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला असून सामाजिक कार्यात मात्र व्यस्त राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला जोरदार विरोध करत पवार जोपर्यंत आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह न सोडण्याचा पवित्रा घेतला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले तर धनंजय मुंडेंचं काही नेत्यांनी व्यासपीठावर जात पवारांचे पाय धरले. पवारांचा हा निर्णय म्हणजे भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वतःपासून केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या साठ वर्षापासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात घोंगावणारा वादळ पवारांच्या या निर्णयामुळे आता संसदीय राजकारणात दिसणार नाही. योग्य वेळी भाकरी फिरवावे लागते, ती फिरविली नाही तर करपते, असं सूचक विधान काही दिवसांपूर्वी पवार यांनी केले होते.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमा दरम्यान आपल्या भाषणावेळी पवार म्हणाले, 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतका प्रदीर्घकाळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक असल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट करत पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा.

तथापि आपण शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आत्तापर्यंत पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा प्रवास 63 वर्ष अविरत चालू आहे. त्यातील 56 वर्ष कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य अथवा मंत्री म्हणून काम करतोय. अद्यापही राज्यसभा सदस्य पदाची तीन वर्ष शिल्लक आहे. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल. मी कोणतेही अन्य जबाबदारी घेणार नाही.

पवारांच्या घोषणेवर कार्यकर्त्यांची नाराजी
साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही आपण आपला निर्णय मागे घ्या. आम्हाला आपला खूप मोठा आधार वाटतो असे भावनिक साथ घालत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ सभागृहात घोषणाबाजी केली. अर्धा तास सुरू असलेल्या या घोषणाबाजी नंतर अजित पवार यांनी व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवारांना गराडा घातला होता. धनंजय मुंडे तर पवारांच्या पायाशी बसून होते. शेवटी कार्यकर्ते नेत्यांच्या मताचा रेटा पाहून समिती जो निर्णय घेईल तो निर्णय पवार साहेबांना मान्य असेल असे अजित पवारांनी सांगितले.

नवीन अध्यक्ष निवडीसाठी समिती
शरद पवार यांनी सांगितले की आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, नरहरी झिरवाळ यांचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना या सर्वांचा विचार करावा, असे देखील पवार म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 536
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.