Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आवश्यक तेथे पाण्याचे टँकर आणि रोहयोची कामे उपलब्ध करून द्या; माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
राजकारण

आवश्यक तेथे पाण्याचे टँकर आणि रोहयोची कामे उपलब्ध करून द्या; माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात

थोरात यांनी घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीला नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे व राष्ट्रवादीचे अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यावर्षी कमी व उशिरा होणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जशी मागणी येईल त्याप्रमाणे तातडीने पाण्याचे टँकर आणि रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी प्रशासनास केल्या.

आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेरात प्रांताधिकारी कार्यालयामध्ये टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, शितल घावटे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदिंसह सर्व विभागाचे प्रशासकीय प्रमुख व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, यावर्षी उशिरा येणाऱ्या आणि कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मागणी येईल त्याप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि रोजगार हमीची कामे प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे.

संगमनेर तालुक्याचा मोठा विस्तार लक्षात घेता सर्व ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. निर्माण होणारा अडचणीचा काळ लक्षात घेता 30 जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याचे, रोजगार हमीच्या कामांचे आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन आत्ताच करून ठेवणे आवश्यक आहे. जलजीवन आणि जीवन प्राधिकरणांच्या योजनांची कामे ज्या-ज्या ठिकाणी सुरू आहे ती कामे कोणत्याही स्थितीत बंद होता कामा नये. गावागावातील नळ योजना तातडीने दुरुस्त करून घ्या. विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

डॉ. लहामटे म्हणाले, जलजीवन व जीवन प्राधिकरणाची कामे चांगली झाली तर आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या येणार नाही. आमदार थोरात व महाविकास आघाडीने अत्यंत चांगल्या योजना राबविल्या असून त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांच्या तक्रारी येणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मिराताई शेटे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले तर नायब तहसीलदार लोमटे यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 414
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.