Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर
राजकारण

नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर

समिती निर्णय पवारांना कळविणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2023Updated:05/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज)
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उडालेला गदारोळ थांबण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अशा आशयाचा ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.
राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद पवार हेच तहह्यात राष्ट्रीय अध्यक्ष ठेवण्याचा ठराव मांडण्यात आला. शरद पवार यांचा राजीनामा फेटाळून लावण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
बैठकीत ठरलेला हा निर्णय शरद पवार यांना कळवला जाणार आहे. राष्ट्रवादीचे काही नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना हे ठराव कळवणार आहेत. या बैठकीला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, पीसी चाको, सुनील तटकरे आणि इतर नेते उपस्थित होते.
बैठकीत इतर कोणताच ठराव मांडला गेला नाही. कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पर्यायी अध्यक्ष कोण असावा यावर एका शब्दानेही चर्चा झाली नाही. फक्त चार ओळींचा ठराव मांडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 320
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: समाजमाध्यमांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या आणि नशेसह शारीरिक ताकदीसाठी बेकायदेशीरपणे…

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.