Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रूढी परंपरा काळात सामाजिक संस्थांना देणगी देत भावंडाकडून आईचे पुण्यस्मरण; विचारवंत प्राध्यापक देशमुख यांच्या व्याख्यानाचा जागर
सामाजिक

रूढी परंपरा काळात सामाजिक संस्थांना देणगी देत भावंडाकडून आईचे पुण्यस्मरण; विचारवंत प्राध्यापक देशमुख यांच्या व्याख्यानाचा जागर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
सामाजिक जाणीव आणि संवेदना जागृत ठेवत शिक्षक सुनील कडलग व अनिल कडलग, लता पुष्पा व उषा या भावंडांनी आपल्या आईच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने रूढी परंपरा बाजूला ठेवत स्वामी विवेकानंद वाचनालय आणि आधार संस्थेस देणगी दिली. याचबरोबर विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून प्रेरणादायी कार्य केले.

रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे संस्थापक सुनील कडलग आणि आधार संस्थेमार्फत सामाजिक काम करणारे अनिल कडलग यांच्या मातोश्री शकुंतला किसन कडलग यांचे सोमवारी (ता.8) प्रथम पुण्यस्मरण होते.

आयुष्यभर सामाजिक जाण व भान जपणाऱ्या आईचा स्मृतीजागर हा प्रा. सोपानराव देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करून व जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद वाचनालयास रुपये २१ हजाराची देणगी आणि अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या आधार या सामाजिक संस्थेला ११ हजाराची देणगी देऊन आईच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय सुनील कडलग, अनिल कडलग, त्यांच्या भगिनी लता कवडे, पुष्पा देशमुख, उषा मोराडे आणि वृषाली व मंदा कडलग यांनी घेतला.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, आजपर्यंत हिंदू धर्म संस्कृतीने अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नाकारला ही फार मोठी चूक झाली. आता आपल्याला समाज व्यवस्था बदलावी लागेल व आपल्याला आपले म्हणण्याची दानत दाखवावी लागेल. रामायण लिहिणारा वाल्या कोळी हा आदिवासी होता हे विसरता येणार नाही. त्याचबरोबर महाभारत लिहिणारा व्यास हा एका मासे पकडणाऱ्या आदिवासी महिलेचा मुलगा होता. चुकीने मुस्लिम झालेला नेताजी पालकर यास छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात सामावून घेतले याचे अनुकरण आपण केले पाहिजे.

हिंदू धर्मातच जर आंतरजातीय विवाह होत असतील तर त्याचा स्वीकार करून आपण आता समाजव्यवस्था बदलत आहे हा संदेश दिला पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी लढा देणारे शाहू महाराज, स्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले, आणि देशाला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांचे अनुकरण आपण केले पाहिजे.

जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास दिलेली देणगी वाचनालयाचे संचालक, जवळे कडलगचे उपसरपंच निलेश कडलग, प्रताप कडलग, गोकुळ खडांगळे, सुनील महाले व भाऊसाहेब गोसावी यांनी स्वीकारली तर आधार फाउंडेशनला दिलेली देणगी प्रभाकर सोनवणे, डॉ. महादेव अरगडे, लक्ष्मण कोते, सुखदेव इल्हे यांनी स्विकारली. यावेळी शिक्षक बँकेच्या संचालिका सरस्वती घुले, मनीषा शिंदे, सुनील घुले, सुभाष ताजणे, डॉ. महादेव अरगडे, प्रा. चं. का. देशमुख, भाऊसाहेब गायकर, प्रा. राधाकृष्ण आरोटे, तान्हाजी कवडे, विलास देशमुख, नानासाहेब मोराडे, डॉ. चित्रलेखा देशमुख, वैशाली देशमुख उपस्थित होते.

सूत्रसंचालन विठ्ठल कडूसकर यांनी केले. उपसरपंच निलेश कडलग यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 631
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026

वीज मंडळाच्या कारभाराविरोधात शिवसैनिकांचा आंदोलनाचा इशारा; वीजपुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र कानकाटे यांची मागणी

02/09/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.