Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बस स्थानकाजवळचा हॉटेल कश्मीर समोरिल अनधिकृत रिक्षा स्टॉप बंद करा…
महाराष्ट्र संवाद विशेष

बस स्थानकाजवळचा हॉटेल कश्मीर समोरिल अनधिकृत रिक्षा स्टॉप बंद करा…

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संगमनेर बस स्थानकाजवळचा हॉटेल कश्मीर समोरील अनधिकृत रिक्षा स्टॉप बंद करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या अनधिकृत रिक्षा स्टॉपजवळ राजू आखाडे यांची अल्पवयीन मुलगी उन्हाच्या तीव्रतेने भोवळ येवून पडली असता, या रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालकांनी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान याचवेळी येथून योगेश सूर्यवंशी, विशाल वाकचौरे, दिपक रणशेवरे जात होते. त्यांनी मुलगी तीव्र उन्हात रस्त्यावर पडलेली पाहिली, त्यांनी तिला तत्परतेने सावलीत नेवून पाणी पाजले, तरीही तिला अस्वस्थ वाटत होते.

त्यामुळे या तिघांनी संयमाची भूमिका घेवून तिला दवाखान्यात नेण्याची व त्यासाठीचे रिक्षा भाडे देण्याची विनंती या स्टॉपवरील रिक्षा चालकांकडे केली. परंतु या मुजोर रिक्षा चालकांनी त्यांच्या विनंतीला दाद दिली नाही. उपचारासाठी मुलीला रुग्णालयात नेण्यास टाळाटाळ करत कोणतेही पॅसेंजर नसतांना आम्हांला नंबर आहे, असे सांगितले. अश्या आमच्या समोर रोजच घटना घडत असतात. आम्ही काय ठेका घेतला का? आम्हांला त्या मुलीशी काही देणे घेणे नाही. अशी रिक्षा चालकांनी भूमिका घेतली.

त्यामुळे या तिघांनी चिडून रस्त्यावर जाणारी रिक्षा अडवली, त्यात मुलीला बसवले. तिला तिच्या घरी नेले. तिच्या घरच्यांशी चर्चा केल्यानंतर घरच्यांनी तिला दवाखान्यात नेले. सामाजिक जाणिवेतून मदत करण्याऐवजी उलट रस्त्यात अडथळा निर्माण करून आपणच रस्त्याचे मालक असल्यासारखे वागणाऱ्या रिक्षाचालकांमुळे या ठिकाणी वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होत असतो.

या रिक्षा स्टॉपच्या रिक्षा चालकांकडे बॅच बिल्ला आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. तसेच परवाना नसलेल्या स्क्रॅप स्थितीत असलेल्या रिक्षा या ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. वाहतूक पोलिसांसमोरूनच अशा प्रकारच्या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असताना देखील त्यांना रोखले जात नाही. या रिक्षा स्टॉपमुळे अनेक अपघात होतात. हे रिक्षा चालक टोळक्याने उभे राहून महिला-मुलींची टिंगल टवाळी करतात. शालेय विद्यार्थिनींना पुढे शेजारी बसवतात. जाणीवपूर्वक स्पर्श करतात. रात्रीच्या वेळी अवास्तव भाडे आकारतात.

या संदर्भात यापूर्वीही एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी तक्रार केली होती. त्यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांनी जुजबी कारवाई केली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 779
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.