(महाराष्ट्र संवाद न्यूज)
‘द केरला स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाचे धर्म जागृती मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने संगमनेरमध्ये ३ शोचे मोफत आयोजन केले होते. संगमनेरकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला.
“द केरला स्टोरी” हा चित्रपट धर्मांतर व लव्ह जिहाद या विषयावर आधारित असून कट्टरपंथी जिहादी व आतंकवादी संघटना, देश विघातक संस्थाच्या षडयंत्राद्वारे महाविद्यालयीन विदयार्थीनी व अल्पवयीन मुली आपल्या जाळ्यात ओढून सिरिया- अफगाणिस्तान सारख्या देशांत पाशवी बलात्कार व अत्याचार करण्यासाठी पाठविल्या जातात. अश्या धर्मांध वृत्तीपासूनच्या अमानवीय कृत्यापासून हिंदू मुली व महिला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांचे प्रबोधन म्हणून हा मोफत चित्रपट दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता.
हिंदू धर्मजागृती मोहीम अंतर्गत विहिंप, बजरंग दल, संगमनेर यांच्यावतीने करण्यात आला होता. संपूर्ण दिवसभराचे तिन्ही शो संगमनेरकरांना विशेषतः महिला, मुलींना दाखवण्यात आले. ३०० ते ३५० भगिनींनी याचा लाभ घेतला.
यासाठी श्रीप्रसाद कानडे, रोशन कोथमिरे, योगेश सातपुते, संकेत ठोसर, प्रशांत राऊत, अजित भारते, अश्विनीकुमार बेल्हेकर, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, संकेत सोनवणे, सुमित वाकचौरे, सोहम नेवासकर, तेजस कराळे, शुभम ढमाले, गणेश कुटे, आदित्य कानकाटे, जय घेगडमल, बालाजी लालपोतु, विश्वेश्वर मोहरीकर, यश धात्रक, रोहन गुंजाळ, आकाश जोर्वेकर, श्रीरामपूर दुर्गावाहिनी संयोजिका सपना थेटे, संगमनेर दुर्गावाहिनी संयोजिका शामल बेल्हेकर आदींनी परिश्रम घेतले.

