अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
कर्मचारी भविष्य निधि संघटन (ई.पी.एफ.ओ.) कडून सदस्य, निवृत्तीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात ‘निधि आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अहमदनगरच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २९ मे २०२३ सर्वांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये मालपाणी इंडस्ट्रियल पार्क समोर अकोले रोड येथे शिवशक्ती इमारतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या सदस्यांच्या भविष्य निधीबाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. याच कार्यक्रमात तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, असे सहायक भविष्य निधी आयुक्त जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी कळविले आहे.

