Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

21/10/2026

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड करत विनयभंग करणाऱ्या फरहान सय्यदवर गुन्हा… दामिनी पथक कार्यान्वित करण्याची आवश्यकता
गुन्हेगारी

महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड करत विनयभंग करणाऱ्या फरहान सय्यदवर गुन्हा… दामिनी पथक कार्यान्वित करण्याची आवश्यकता

महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/05/2023Updated:19/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा सातत्याने पाठलाग करत गुरुवारी सकाळी भर रस्त्यात तिचा हात पकडत ‘मैं तुझसे प्यार करता हूं’ असे म्हणत तिने विरोध करताच तिला मारहाण व छेडछाड करणाऱ्या फरहान सय्यद याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात फरहान सय्यद याच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून कुठेही दिसत नसलेले शहर पोलिसांचे दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित तरुणी एम.एस.सीचे शिक्षण घेत असून गेल्या महिनाभरापासून शहरातीलच फरहान सय्यद नावाचा तरुण तिचा वारंवार पाठलाग करत तिला त्रास देत होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही तरुणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बस स्थानकाकडे पायी जात असताना फरहान सय्यदने तिला भर रस्त्यात अडविले. ‘ये रुक, मुझे तेरे से बात करनी है, मै तुझसे प्यार करता हु,’ असे म्हणत त्याने तेथेच तिचा हात देखील पकडला. त्यामुळे तिने त्याला विरोध करत ‘मुझे तेरे साथ कोई बात नही करनी,’ असे सांगतात त्याने तिला भररस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तुझे कोणाशी अफेअर आहे, याची माहिती आहे, असे सांगत तिला धमकावण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने घरी जात याची माहिती वडिलांना दिली. आणि त्यानंतर वडिलांसह पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून फरहान सय्यद याच्या विरोधात तक्रार दाखल केली. फरहान सय्यद याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354 (ड) (1), 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 694
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘आरोपी अजूनही त्रास देतोय का?’ पीडित महिलांना पोलिसांचा फोन जाताच उघड झाली ‘ही’ मोठी माहिती

19/10/2026

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

बाळासाहेब थोरातांचा राज्य सरकारला मोठा इशारा: ‘कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात तातडीने चारा छावण्या सुरू करा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!’

By Annant Ppangarkar21/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यामध्ये दुष्काळाचे अत्यंत भीषण सावट पसरले असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा…

संगमनेरमध्ये जनसागर! ३६ फुटी रावणदहन अन् हजारो झाडांचे वाटप; मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘सीमोल्लंघन’चा उत्साह

21/10/2026

अंकाई गडावर दर्शनासाठी गेले अन् काळानं घाला घातला! भाजपा कायदा सेलचे पदाधिकारी असलेल्या संगमनेरच्या वकिलाचे निधन

21/10/2026

बुधवार, २१ ऑक्टोंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.