Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच घेणाऱ्या खासगी इसम ‘दडियाल’सह कोपरगावचे ‘तहसीलदार विजय बोरुडे’ एसीबीच्या ताब्यात
गुन्हेगारी

वाळू वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच घेणाऱ्या खासगी इसम ‘दडियाल’सह कोपरगावचे ‘तहसीलदार विजय बोरुडे’ एसीबीच्या ताब्यात

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 20, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कोपरगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज)

वाळू वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनावर महसूल विभागाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या खासगी इसम गुरमीत सिंग दडियाल (वय ४० वर्ष, रा. कोपरगाव) याला नासिक एसीबीने रंगेहात पकडले. दडियाल आणि तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोपरगावमध्ये थेट तहसीलदारांवरच एसीबीचा ट्रॅप झाल्याने जिल्ह्यातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोपरगाव येथील तक्रारदार यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये याकरीता, कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे (वय ४४ वर्षे, रा. कोपरगाव) यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने यासंदर्भात नाशिक एसीबीसी संपर्क करत तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचखोरांना पकडण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी सापळा लावला होता.

तहसीलदार विजय बोरुडे यांच्या सांगण्यावरून त्यांचे निकटवर्तीय गुरुमित सिंग दडियाल याला शुक्रवारी (ता. १९ मे) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. दडियाल यांने तहसीलदार बोरुडे यांच्यासाठी ही लाच स्वीकारल्याचे मान्य केले असून तहसीलदार बोरुडे यांनी लाचेची रक्कम घेण्यास दडीयाल यांस प्रोत्साहन दिल्याबद्दल दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

नासिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील यांच्यासह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक नितीन कराड, प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महसूलमंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष…

अवैध वाळू तस्करी थांबविण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणणाऱ्या महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात महसूलचे अधिकारी खुलेआम लाचखोरी करत असल्याने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आवाहन…

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की ज्या कोणाकडे कोणत्याही विभागाचा शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी माणूस शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ ०२५३ २५७८२३० व ०२५३ २५७५६२८ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 631
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.