Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भानुदास तिकांडे तर उपसभापती रोहिदास भोर
राजकारण

अकोले बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भानुदास तिकांडे तर उपसभापती रोहिदास भोर

महाविकास आघाडी कडून दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 24, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज)

अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व महाविकास आघाडी प्रणित शेतकरी समृद्धी मंडळाचे संचालक भानुदास तिकांडे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचेच रोहिदास भोर निवडून आले. विरोधी भाजप उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला.

बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी बुधवारी निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे व भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळाकडून बाळासाहेब सावंत यांनी, उपसभापती पदासाठी मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी उपसभापती रोहिदास भोर व भाजपकडून शिवराम अरज यांनी अर्ज दाखल केले होते.

सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली यात सभापतीपदासाठी भानुदास तिकांडे, उपसभापती पदासाठी रोहिदास भोर यांना 11 मते मिळाली. तर सभापती व उपसभापती पदासाठी पराभूत झालेले भाजपच्या बाळासाहेब सावंत व शिवनाथ आरज यांना प्रत्येकी 7 मते मिळाली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी पार पडल्या. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कापसे व अकोले बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे यांनी सहकार्य केले.

घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेत महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांना कोकणच्या सहलीवर नेण्यात आले होते. पाच दिवसांच्या सहली नंतर हे सर्व संचालक आज बुधवारी सकाळी अकोल्यात परतले. त्यानंतर या संचालकांसमवेत आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मनोज मोरे उपजिल्हाप्रमुख महेश नवले यांची एकत्रित बैठक झाली या बैठकीत संचालकांनी सभापती, उपसभापतीपदाचा उमेदवार ठरविला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 320
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.