महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोट निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.
बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य करत या चर्चांना दुजोरा दिला आहे.
टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला. आगीच्या घटनेची चौकशी व्हावी, तसेच आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
त्यावेळी पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार का? असे अजित पवार यांना मीडियाने विचारले. त्यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही, असं मला वाटतं होतं. पण आता या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची माझी आतल्या गोटातली बातमी आहे.
उमेदवारी संदर्भात ते म्हणाले तिथे निवडणूक लागेल तिथे ज्यांचे ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी. पुण्यामध्ये इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली.

