Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोमनाथ वाकचौरे यांनी स्वीकारला पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार
महाराष्ट्र संवाद विशेष

सोमनाथ वाकचौरे यांनी स्वीकारला पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार

दीर्घ प्रतीक्षेनंतर संगमनेर-अकोलेला मिळाले नवे डीवायएसपी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर-अकोलेच्या पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार भुसावळ येथून बदलून आलेल्या सोमनाथ वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी स्वीकारला. संगमनेरचे प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या पदावर गृह विभागाने वाकचौरे यांची नियुक्ती केल्याने त्यांचा येथील कार्यकाळ कसा राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

संगमनेरचे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांची नागपूरला बदली झाल्यापासून संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संगमनेरची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनातील आपल्या कार्यालयात प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला.

वाकचौरे यांनी यापूर्वी काही काळ श्रीरामपूर विभागामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना संगमनेर तालुका बऱ्यापैकी माहिती आहे. संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार घेतेवेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे उपस्थित होते.

वाकचौरे संगमनेरसाठी नवे असले तरीदेखील श्रीरामपूर उपविभागात त्यांनी काम केल्याचा पूर्वानुभव आहे. संगमनेर अकोले तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सहाही पोलीस ठाण्यात नवे पोलीस अधिकारी यापूर्वीच नियुक्त झालेले असल्याने वाकचौरे यांना नवी टीम मिळाली आहे. या नव्या टीममध्ये काही अनुभवी अधिकारी आहेत. याशिवाय पोलीस दलात नुकत्याच मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल्या झाल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या पोलीस ठाण्यांमध्ये नव्यानेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. त्यामुळे आता या नव्या टीमसोबत गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्याच्या कार्यक्षेत्रात वाकचौरे यांच्या अंतर्गत सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेरमधील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी आणि अकोले तालुक्यातील अकोले व राजुर पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. संगमनेर अकोल्यातील प्रलंबित गुन्ह्यांसोबतच नव्याने घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीने वाकचौरे यांना लक्ष घालावे लागणार आहे. याशिवाय पोलीस खात्याला लाभाचे ठरणारे आणि अडचणीत आणणारे अवैध धंदे देखील वाकचौरे कशा पद्धतीने हाताळतात हेही येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 528
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.